Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ६

२५

चुडीयाचं माझ्या, सोनं बिनलाखीचं

पिता दौलतीच्या पारखीचं

२६

माझ्या चुडीयाचं सोनं पिवळं हाडूळ

पिता दौलतीनं केली पारख वाढूळ

२७

चुडीयाचं माझ्या सोनं, रुपै चांदवडी

पिता दौलतीनं केली पारख घडूघडी

२८

चुडीयाचं माझ्या सोनं, तिन ठाईं लवं

पित्याची पारख चोखट मला ठांव

२९

शेजी लेनं लेती, लाखेवरलं सोनं

हातीचं चुडं, माझ नऊ लाखाचं लेनं

३०

धनसंपत देरे देवा तूं माफक

राज चुडियाचं अधिक

३१

दिस उगवला, किरनं टाकीतो बिगीबिगी

चुडेदान माराया जाऊं दोघी

३२

सकाळी उठूनी जाते देवाच्या वाडयाला

औख मागते चुडयाला

३३

सुर्ये उगवला, झाडाझुडावरी

तेज माझ्य चुडयावरी