दत्त आरती - विडा घ्याहो सद्गुरुराया ...
विडा घ्याहो सद्गुरुराया । धरूनी मानवाची काया । यतिवेष घेउनिया । वससी दीनासी ताराया ॥धृ.॥
ज्ञान हे पूगीफळ । भक्ति नागवल्लिदल । वैराग्य चूर्ण विमल । लवंगा सक्रिया सफळ । विडा. ॥१॥
प्रेमरंगी जैसा कात । वेळा अष्टमात्रांसहित । जायफळ क्रोधरहित । पत्री सर्वभूतहित । विडा. ॥२॥
खोबरें हेंचि क्षमा । फोडुनी द्वैताच्या बदामा । मनोयजाचा वर्ख हेमा । कापूर हा शांतिनामा । विडा. ॥३॥
कस्तुरी निरहंकार । कोठें न मिळती हें उपचार । भीमापुत्र यास्तव फार । प्रेमें विनवी वारंवार ॥ विडा. ॥४॥