दत्ताची आरती - जो जो जो रे श्री आरती दत्...
जो जो जो रे श्री आरती दत्ताची ॥
जय जय परात्पर । गुरुराया ।
सच्चिध्दनमत्ध्ददया तदुपरी प्रेमभरें ।
बा सदया । ओवाळीन ही काया ॥ धृ. ॥
हस्तपाद चारी । सुस्तंभी ।
देवालय आरंभी । मध्य मेरु आडें ।
अवलंबी । उभयास्थितयाकांबी ॥ १ ॥
वेषून वर्मांचें । दातारा अग्रभागी गाभारा सोड हे हंसाच्या ।
बिडारा । श्वासोच्छ्वासा धारा ॥ २ ॥
इडाणि । पिंगल सुषुम्ना ॥
त्रिवेणिसंगमजाणा । तेथें मज घाली ।
बस्नाना तारि हरि या दीना ॥ ३ ॥
नानाविध मूर्ती । करिं वाती ।
श्रद्धाघृत त्यावरती । केशव ओवाळी ।
अल्पमती सद्गुरुस्मरण ज्योती ॥ ४ ॥