दत्ताची आरती - जय श्रीदत्ता आरती तुजला क...
जय श्रीदत्ता आरती तुजला करितों मी भावें ।
मंदमती हा पातक परि तव दर्शन मज द्यावें ॥ धृ. ॥
अनाथ आम्ही अधम पातकी नकळे हित आपुलें ।
क्षणिक सुखातें नित्य मानुनी मन विषयी रमलें ॥
धनमानादिक संचित करणें सार्थक हे गमलें ।
अति गहन या मोहविपिनीं चित्त सुचिर भ्रमले ॥
यांतुन दत्ता योगी जन ते तव नामें तरलें ।
विठ्ठलात्मज विनवितसें मज भवनदी उतरावें ॥ १ ॥