Get it on Google Play
Download on the App Store

मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू

मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू । सावळा नंदनु नंदाचा ॥१॥
तेणॆ गोपिका वेधल्या । पात्र झाल्या ब्रह्मसुखा ॥२॥
रंजविल्या विनोदवचनी । हस्य करुनि हासवीतु ॥३॥
निळा म्हणे त्यांचिया गळां । घाली वेळोवेळां करपल्लव ॥४॥
भजन - ज्ञानदेव तुकाराम
पुंडलिकवरदा हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ।