Get it on Google Play
Download on the App Store

एकीच्या भावासाठी आणि एकाच्या बहिणीसाठी बुचकळ्यात पडलेला मी...

आज पहिल्यांदा मी न सुटणाऱ्या बुचकळ्यात पडलो. कारण पण तसेच होत. नेहमी बडबड करणारा मी मात्र दोन साध्या प्रश्नानी मला पूर्ण निशब्द केलं. काय बोलावं कळेना मला. हे कोड मात्र सुठेना झालं होत मला. प्रश्न काही खूप अबघड नव्हते एकदम साधे होते. पण त्या प्रश्नात पण खूप मोठा अर्थ, दुःख, मर्म, दडलं होत. नजाणून ते मला पण त्रास करत होत. दोन व्यक्ती माझ्या आयुष्यात आलेल्या. ज्यांना मी कधी जास्त ओळखत नव्हतो पण आज मात्र इतकं प्रेम आहे आमच्यात कि त्याला शब्दात पण वर्णन करता येत नाही.


मी या लेखाला नाव दिलय त्यावरूनच खूप काही कळलं असेल पण मी का बुचकळ्यात पडलो..? मी का निशब्द झालो..? रक्ताची नाहीत पण मानलेली असताना पण इतकं असं का झालं..? त्यांचा त्रास मला पण का जाणवू लागला..? अनोळखी असणारी ती दोघजन आज मात्र खूप काही खास बनून गेले आहेत. ती दोघ आयुष्यात खूप दुःख सहन करून पण आज एक चांगली प्रगती करत आहेत. त्यांच्याकडून मी खूप काही शिकलोय, आणि अजून पण शिकतोय..


त्यांची नावे मला नक्कीच घ्यायला आवडतील.

1) निकिता (ताई), इचलकरंजी.

2) अजय सावंत (भाऊ), कराड.


ह्याच त्या दोन व्यक्ती ज्यांच्या साध्या सोप्या प्रश्नाने मला बुचकळ्यात. ते प्रश्न पण नक्की सांगू वाटतंय. ज्याचं उत्तर अजून पण मी शोधतोय. लवकर त्याची उत्तरे मला मिळावीत हि देवाकडे प्रार्थना करतो. तर ते प्रश्न असे की-


निकिता ताई- मला एखादा भाऊ असता तर..? मी पण रक्षाबंधन ला त्याला राखी बांधली असती...?


अजय भाऊ - भावा ज्याला बहीण नाही त्याने काय करावं...?


किती लहान आणि साधे प्रश्न आहेत ना. पण यात देखील दुःख, भावना, प्रेम, आणि कमतरता हे सर्व काही दडलं आहे. हे दोन प्रश्न ऐकल्यावर कुणाला काय बोलावे मला काहीच कळेना. मी पूर्णपणे निशब्द झालो.


निकिता दीदी बद्दल बोलावं तर तिला भाऊ आणि बाबा पण नाहीयेत, आणि दुसर पण तसेच आहे अजय भाऊ ला पण बहीण आणि बाबा नाहीयेत.


निकिता दीदी बद्दल-

खूप दिवसापूर्वी माझं आणि निकिता दीदी च बोलणं झालं होतं. ते असं की भावाबद्दल बोलत होतो. त्यावेळी ती मला बोलली होती की- मी प्रत्येक रक्षाबंधन ला भावाची वाट बघत असते, माझ्या पण मनात येत कि मला पण भाऊ असता तर..तो पण माझी काळजी केला असता. माझ्यावर खूप प्रेम केला असता. पण माझ्या नशिबात भाऊ पण नाहीय. त्यावेळी मला पण तीच दुःख सहन नाही झालं. आणि मी भावनेच्या आणि तिच्या आनंदासाठी मी तिला बोललो कि- इथून पुढच्या प्रत्येक रक्षाबंधन ला मी तुझ्याकडे राखी बांधायला येईन. आणि आज माझ ते वचन पूर्ण होत आहे. आमच्या आयुष्यातील हे पहिलेच रक्षाबंधन..नंतर मला वाटलं की- मी येतो बोललो आहे पण मी तिला नक्की भेटेन का. ..? मी घरी आणि कुठेतरी बाहेर..? हे प्रश्न मला खूप त्रास देत होते. पण म्हणतात ना कि- मनापासून केलेली गोष्ट नक्की पूर्ण होते. मी देवाकडे हीच प्रार्थना करत होतो की आम्ही रक्षाबंधन ला भेटायला पाहिजे...? आणि आज अखेर देवाने माझी प्रार्थना ऐकली. आणि योगायोग पण किती जुळून आला की ती पण पुण्यात आहे आणि मी पण सध्या पुण्यात आहे...आज रक्षाबंधन आज तिला भेटलो. वचन पूर्ण झालं...पण असं म्हणता येणार नाही. आयुष्यभर मला करायचं आहे...देवाकडे हीच प्रार्थना आहे की- प्रत्येक वेळी आम्ही असच भेटावं आणि आयुष्यभर असच प्रेम आमच्यात राहो.. खरच जिला भाऊ नाही तिचा भाऊ बनण्यात पण एक वेगळच सुख आहे..आणि आज मी ते अनुभवतोय..


अजय भाऊ बद्दल- 

मला स्टेट्स वाचण्याची आवड, त्याचबरोबर कविता पण. मला एक ग्रुप ऍड आहे. स्टेट्स चा पाऊस असं नाव आहे त्याच. ह्या ग्रुप वरून आमची ओळख झाली. आधी इतकं काही नव्हतं आमच्यात पण हळू हळू आमच्यात जवळीक वाढू लागली. त्याच्याशी एकदा फोन वर बोलल्यावर एक वेगळंच बंध आमच्यात जुळलं आणि ते पन आयुष्यभरासाठी एका मित्रापासून तो कधी भाऊ बनून गेला हे मात्र कधी कळलंच नाही. काल मी एक ब्लॉग टाकला होता. बहिणीबद्दल त्याला त्याचा अलगद असा प्रश्न माझ्या थेट काळजावर वार केला. तो असा- भावा ज्याला बहीण नाही त्याच काय..? नेहमी त्याला बडबडणारा मी काल मात्र त्याच्या साधा प्रश्नाने माझी बोलती बंद केली. शब्द सागराचे काल मात्र निशब्द होऊन गेले. काय बोलू मला कळेना झालं होतं. काल त्याच दुःख ऐकून नकळत माझ्या पण डोळ्यात पाणी आलं. तो पण खूप दुःखी झाला होता. पण त्यातून पण त्याने सावरून मला बोलला कि भावा तू नको टेन्शन घेऊ. माझ्या नशिबात असच आहे. त्याला मी तरी काय करणार.


खरंच खूप वाईट वाटतंय यांचं कि एकीला भाऊ नाहीय आणि एकाला बहीण नाही. आणि त्याचबरोबर दोघांनापन बाबा नाहीयेत. ज्यांना बहीण भाऊ आणि बाबा आहेत. त्यांना त्याची किंमत नाही, आणि ज्यांना नाही आहेत. त्यांना मात्र खूप किंमत आहे. खरंच या जगात ना असण्यापेक्षा नसण्याला खूप महत्व आहे.


खरच निकिता दीदी आणि अजय भाऊ.. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळतंय..बाबा नसताना पण तुम्ही कष्टातून स्वतः च काहीतरी अस्तित्व तयार करताय. तुम्ही माझे बहीण भाऊ आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे.


*" अशीच तुमची साथ नेहमी असावी हीच अपेक्षा. "*

                  *धन्यवाद..!*