संत तुकाराम - काय तुज माझी न येईच दया ।...
काय तुज माझी न येईच दया । काय देवराया पाहतोसी ॥१॥
आळवितों जैसें पाडस कुरंगिणी । पीडिलिया वनीं तहान भूक ॥२॥
तेवीं प्रेमपान्हा पाजीं माझे आई । येईं वो विठाई वीरसोनी ॥३॥
तुका म्हणे माझें कोण हरी दुःख । तुजवीण एक पांडुरंगा ॥४॥