संत तुकाराम - कोणा दाउनियां कांहीं । ते...
कोणा दाउनियां कांहीं । तेंचि बाहीं चाळवी ॥१॥
तैसें नको देवा । शुद्ध भावा माझिया ॥२॥
रिद्धी सिद्धी ऐसे आड । येती नाड नागवूं ॥३॥
जळा दाउनियां ओढी । उर फोडी सळई ॥४॥
दिलें दर्पणींचें धन । दिसे पण चर्फडी ॥५॥
तुका म्हणे पायांसाठीं । करीं आटी कळों द्या ॥६॥