दहा पारमिता
दहा पारमिता ह्या शील मार्ग अाहेत..
१) शील
शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल.
२) दान
स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसर्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे.
३) उपेक्षा
निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे.
४) नैष्क्रिम्य
ऐहिक सुखाचा त्याग करणे.
५) वीर्य
हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे.
६) शांती
शांति म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे.
७) सत्य
सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये.
८) अधिष्ठान
ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय.
९) करुणा
मानवासकट सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता.
१०) मैत्री
मैत्री म्हणजे सर्व प्राणी, मित्र, शत्रू याविषयीच नव्हे तर सर्व जीवनमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे.