A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/tmp/ci_sessionsqrbf4stj2q2ngc2k9nfv6e9ekf63ust): failed to open stream: No such file or directory

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 172

Backtrace:

File: /var/www/bookstruck/application/controllers/Book.php
Line: 14
Function: __construct

File: /var/www/bookstruck/index.php
Line: 317
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /tmp)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /var/www/bookstruck/application/controllers/Book.php
Line: 14
Function: __construct

File: /var/www/bookstruck/index.php
Line: 317
Function: require_once

आरंभ : मार्च २०२० | २०२०: नवीन सिनेमे,नवीन शक्यता,नवीन आशा - निखील शेलार| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories

Android app on Google Play

 

२०२०: नवीन सिनेमे,नवीन शक्यता,नवीन आशा - निखील शेलार

दादासाहेब फाळके या मराठमोठ्या माणसाने राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला चित्रपट १९१३ स प्रदर्शित केला. त्यावेळी कोणीच असा विचार केला नसेल की हे रोपटे एकदिवस महावृक्षाचे रूप घेईल. आज भारतात हिंदी, इंग्लिश, मराठी आणि आदी प्रादेशिक भाषेत सुमारे दोन हजार सेन्सॉर संमत चित्रपट प्रदर्शित होतात. यात आपले मराठी चित्रपट सुद्धा मागे नाहीत. व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर यासारख्या दिग्दर्शकांनी जुना सुवर्ण काळ गाजवला. पण नव्वद दशकानंतर तोच तोच थिल्लरपणा मराठी चित्रपटात दिसू लागला आणि मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपटाकडे पाठ दाखवली. हा मंदीचा काळ असाच चालू असताना संदीप सावंत नावाच्या नवोदित दिग्दर्शकाने श्वास नावाच्या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीसाठी नवीन दृष्टी दिली. मराठी चित्रपटांनी अक्षरशः कात टाकली. नवीन दिग्दर्शक, नवीन कलाकार, नवीन तंत्रज्ञ या सगळ्यांनी चाकोरी बाहेरचे सिनेमे बनवायला सुरुवात केली आणि परिणामी मराठी प्रेक्षक पुन्हा चित्रपट गृहाकडे वळू लागला. २०१९ ला तब्बल १२० मराठी सेन्सॉर संमत सिनेमे प्रदर्शित झाले. हे वर्ष मराठी चित्रपटासाठी संमिश्र प्रतिसादाचे ठरले. २०२० सुद्धा नवीन चित्रपट, नवीन कल्पना, नवीन प्रयोग, नवीन चेहरे घेऊन येत आहे. त्यावर एक छोटासा दृष्टिक्षेप टाकू या.

२०२० च्याच पहिल्या आठवड्यात झी सिनेमा हा समीर विद्वांस दिग्दर्शित आणि क्षितिज पटवर्धन लिखित धुरळा हा सिनेमा घेऊन आला. मल्टीस्टारर असलेला या चित्रपटाला चांगला वेलकम आणि उत्तम प्रतिसाद प्रेक्षकांनी देऊन नवीन वर्षाला चांगली सुरवात झाली. जानेवारीच्याच दुसऱ्या आठवड्यात तान्हाजी हा ओम राऊत दिग्दर्शित हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट हिंदी असला तरी यात खूप मराठी कलाकारांची हजेरी होती. या मराठमोळ्या आणि शिवकालीन अजरामर कथेला पूर्ण भारतात उत्तम प्रतिसाद भेटतोय. हा पण एका बाजूने मराठीचा विजय म्हणावा लागेल. तसा हा चित्रपट मराठीत डब होऊन सुद्धा प्रदर्शित झाला आहे.
सैराटच्या आर्चीचा म्हणजे रिंकू राजगुरू अभिनित मेकअप चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. यात तिच्याबरोबर सहअभिनेता चिन्मय उदगीरकर असेल. मराठी चित्रपटातील परफेक्शनिस्ट म्हणून प्रचलित असलेला सुबोध भावेचा भयभीत हा चित्रपट फेब्रुवारीच्याच शेवटच्या आठवड्यात येईल. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच भयभीत करून मनोरंजन करेल अशी चित्रपट वर्तुळात चर्चा आहे. मराठी चित्रपटात म्हणे कथा, संहिता हेच सिनेमाचे खरे हिरो असतात. त्याच वाक्याला खरा ठरवणारा म्होरक्या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकाची मने जिंकत आहे. ही गावातील जातपात, शाळा या विषयावर भाष्य करणारी, चित्रपट महोत्सवात गाजलेली कथा फेब्रुवारीत प्रेक्षकाच्या भेटीस येईल. नेहा पेंडसे आणि सिद्धार्थ मेनन अभिनित जून नावाचा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होईल. जितेंद्र जोशी अभिनित असलेला चोरीचा मामला हा चित्रपट सुद्धा यावर्षी रिलीज होईल. अनिकेत विश्वासराव आणि सिद्धार्थ जाधव यांचा जागो मोहन प्यारे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वर्णी लावेल.

हिंदी आणि प्रादेशिक चित्रपटात सध्या बायोपिक या पिकाची चलती आहे. वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर चित्रपट बनविण्याचे शिवधनुष्य निपुण धर्माधिकारी या वयाने कमी पण हुशार अशा दिग्दर्शकाने उचलले आहे. या आधी धप्पा, बापजन्म असे दोन चित्रपट निपुणचे रिलीज झाले आहेत. धप्पा साठी निपुणला नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मतेचा राष्ट्रीय पुरस्कार भेटला आहे. तान्हाजीच्या यशानंतर बाजीप्रभू देशपांडे या लढवय्या मावळ्याकडे लक्ष जात आहे. फर्जद आणि फत्तेशिकस्त या चित्रपटाच्या यशानंतर दिगपाल लांजेकर या दिग्दर्शकाने जंग जौहर या चित्रपटाची घोषणा केली आहे. यात बाजीप्रभू देशपांडे यांचे महवाचे पात्र असेल. हा चित्रपट जून २०२० मध्ये भेटीस येईल. या विषयात अजुन तिढा निर्माण झाला जेव्हा अभिजित देशपांडे यांनी पावनखिंड या चित्रपटाची घोषणा केली. पावनखिंड म्हणजे पुन्हा बाजीप्रभू देशपांडे चा इतिहास जागा होईल. अभिजित देशपांडे यांनी दोन वर्षांपूर्वी "आणि काशिनाथ घाणेकर" असा यशस्वी चित्रपट दिला होता. अशा प्रकारे दोन निष्णात दिग्दर्शक बाजीप्रभूवर चित्रपट बनवत आहेत.
२०२० मधले अजुन एक आकर्षण की स्वयं बिग बी अमिताभ बच्चन मराठी चित्रपटात दिसणार आहेत. मिलिंद लेले हा दिग्दर्शक अे बी आणि सी डी हा चित्रपट साकार करतोय. यात अमिताभजी, विक्रम गोखले, सुबोध भावे आणि सायली संजीव दिसणार आहेत. ही सायली संजीव म्हणजे काहे दिया परदेस या डेली सोप मधली गौरी. या सायली संजीव साठी हे वर्ष फार महत्त्वाचे आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित सातारचा सलमान मध्ये ती दिसेल तसेच गोष्ट एका पैठणीची यात ती लीड रोलमध्ये दिसेल. अशा प्रकारे हे वर्ष छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर प्रवेश करण्यासाठी आश्वासक आहे.

मन फकिरा या चित्रपटात सुव्रत जोशी आणि अंजली पाटील ही नवी कोरी जोडी दिसेल. गेल्या वर्षी प्रथमेश परब हा कलाकार टकाटक चित्रपट घेऊन आला होता. यंदा तो टल्ली चित्रपट घेऊन येतोय. तसेच २०२० मध्ये काळ हा भयपट येतोय. तत्ताड असे विचित्र नाव असणारा चित्रपट येतोय. वेगळी वाट, विकून टाक, ये रे ये रे पावसा, अनन्या, बलोच, दाह, एकदा काय झाले यासारखे नवनवीन कल्पनेने नटलेले चित्रपट आपले नशीब आजमावण्यासाठी येतील. असाच एक दिवस सैराट आला होता आणि १०० करोडच्या घरात व्यवसाय करत गौरविला गेला. अशीच स्वप्ने पाहत पाहत अनेक निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आपले विषय घेऊन येत असतात. काय कुणास ठाऊक नवा सैराट आपली वाट पाहत असेल २०२० मध्ये.

अशा प्रकारे नवीन वर्ष हे नवीन संकल्पना घेऊन येत आहे. पण मराठी प्रेक्षकांनी सुद्धा मराठी चित्रपट हे चित्रपट गृहात जाऊन पाहिले पाहिजे. संध्याकाळी मराठी डेली सोप मध्ये गुंतत चाललेला मराठी प्रेक्षकांनी चित्रपट गृहात जाऊन या चित्रपटांना प्रतिसाद दिला पाहिजे. केरळमध्ये मल्याळम चित्रपटाचे बजेट २० करोड असते. पण त्याचे पब्लिसिटीचे बजेट त्या तुलनेत फार कमी असते. कारण त्या प्रेक्षकांना फक्त सांगावे लागते की नवीन चित्रपट येतोय. तो चांगला की वाईट हे प्रेक्षक येऊन चित्रपटगृहात ठरवतात. असे मुबलक वातावरण महाराष्ट्रात तयार करण्याची गरज आहे. नवीन चित्रपट हा टीव्ही वर येईल तेव्हाच मी पाहीन ही पळवाट बंद केली पाहिजे. चित्रपट चालले तर नवीन रक्त या मराठी चित्रपटात आपले उपजीविकेचे साधन शोधून याकडे वळतील आणि आपल्याला उतम्मोत्तम चित्रपट भेटतील. चला तर मग नवी  वर्षी नवीन संकल्प करून मराठी चित्रपटांना प्रतिसाद देऊन त्याचा गौरव करू या.

आरंभ : मार्च २०२०

संपादक
Chapters
आरंभ अंक
संपादकीय (निमिष सोनार)
संपादकीय (मैत्रेयी पंडित)
बातम्यांच्या जगात – वैष्णवी कारंजकर
अमेरिकेतील मराठी माणूस – नीला पाटणकर
मातृभाषा म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नव्हे! – आशिष कर्ले
शॉर्ट फिल्म: अँरेंज्ड मॅरेज: लग्नाकडे नेणारा एक सुंदर प्रवास - मिलिंद कोलटकर
रात्रींबद्दलची गोष्ट! – अमृता देसर्डा
अंतरद्वंद्व नाटक परीक्षण - अमृता देसर्डा
२०२०: नवीन सिनेमे,नवीन शक्यता,नवीन आशा - निखील शेलार
नागराज मंजुळे: माणूसपण बहाल करणारी दृष्टी - निखील शेलार
द विचर: पोलंडचा महानायक ! – अक्षर प्रभु देसाई
टोलकेन आणि मिडल अर्थ, लॉर्ड ऑफ द रिंग्स , हॉबिट इत्यादी – अक्षर प्रभु देसाई
|| प्रवासवर्णन ||
हम्पी: एका साम्राज्याची अखेर – अजित मुठे
गाथा गुलशनाबादची - मैत्रेयी पंडित
मिस बुम्बुम: ब्राझीलमधील अनोखी सौंदर्य स्पर्धा - सुलक्षणा वऱ्हाडकर
|| लेख विभाग ||
माई: एक सिंन्धुदुर्ग – किरण दहिवदकर
स्वा. वि.दा. सावरकर: एक धगधगते यज्ञकुंड – वंदना मत्रे
सकारात्मक विचार - सविता कारंजकर
मायमाखली नजर – प्रसाद वाखारे
आमची माती, आमची मिसळ - नवनीत सोनार
आम्ही मैत्रिणी - अनुष्का मेहेर
एक स्त्री – प्रिया भांबुरे
वृध्दाश्रम: गरज की अपरिहार्यता – नीला पाटणकर
|| कथा ||
आगंतुक – सविता कारंजकर
|| कविता विभाग ||
तरीही माझं जीवन सुखाचं होतं – अविनाश हळबे
भाव अंतरीचा – छाया पवार
स्वप्नीच्या फुला – योगेश खालकर
आई कुठे काय करते ? – विलास गायकवाड
सून माझी लाडाची – नीला पाटणकर
शोध – मंगल बिरारी
लिखाणाचे सूत्र – दिपाली साळेकर / खामकर
सुख – भरत उपासनी
चार शब्द स्नेहाचे: प्रसाद वाखारे
|| आरंभचे लेखक आणि आरंभच्या टीमचा परिचय ||