A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/tmp/ci_sessionfd0249citjgkrd3redq8jlfesrc9lfoj): failed to open stream: No such file or directory

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 172

Backtrace:

File: /var/www/bookstruck/application/controllers/Book.php
Line: 14
Function: __construct

File: /var/www/bookstruck/index.php
Line: 317
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /tmp)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /var/www/bookstruck/application/controllers/Book.php
Line: 14
Function: __construct

File: /var/www/bookstruck/index.php
Line: 317
Function: require_once

आरंभ : मार्च २०२० | तरीही माझं जीवन सुखाचं होतं – अविनाश हळबे| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories

Android app on Google Play

 

तरीही माझं जीवन सुखाचं होतं – अविनाश हळबे

माझं घर तसं तीन खोल्यांचच होतं
आजोबांपासून नातवापर्यंत भरलेल होतं,
पोपट, कुत्रा, मांजरांनाही मुक्तद्वार होतं
घरादाराला कधीही 'लॉक'  नव्हतं..
तरीही माझ् जीवन सुखाचं होतं ||१||

आजोबांच स्थान घरात सर्वोच्च होतं
स्वयंपाकघर आजीच्या ताब्यात होतं,
पाहुण्यांचे येणे-जाणे नित्याचच होतं
आई-बाबांना एकमेकांशी बोलताही येत नव्हतं..
तरीही माझं जीवन सुखाचं होतं ||२||

घरासमोर छोटंसं अंगण होतं
तुळस, प्राजक्ताला तिथे फुलता येत होतं,
दारात रांगोळी काढणं अनिर्वाय होतं
विहिरीवरून पाणी भरण कष्टाचं होतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || ३ ||

आंघोळीला लाईफ़बॉय साबण असायचा,
माणसापासून म्हशीपर्यंत सगळ्यांनाच चालायचा,
दात घासायला कडुलिंबाचा फ़ाटा लागायचा-
दगडाने अंग घासणं फ़ारसं सुसह्य नव्हतं
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || ४ ॥

पायात चप्पल असणं सक्तीच नव्हतं
हाफपॅट बनियनवर फ़िरणं जगन्मान्य होतं
शाळेसाठी मैलभर चालण्याचं अप्रूप नव्हतं
मोठ्यांना सायकलशिवाय दुसरं वाहन नव्हतं..
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || ५ ॥

शाळेत गुरुजनांप्रती आदर होता
घोकंपट्टीला दुसरा पर्यायच नव्हता,
पाढे पाठांतराचा आग्रह सर्वत्र होता
छडी हे शिक्षकाचं लाडकं शस्त्र होतं..
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || ६ ॥

शाळेत गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता,
नादारी सांगण्यात काही संकोच नव्हता,
वारावर जेऊन  शिकणाराही एक वर्ग होता
कलांना "भिकेचे डोहाळे" असंच नाव होतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || ७ ॥

नव्या कपड्यांचा लाभ लग्न-मुंजीतच व्हायचा
पाटाखालच्या इस्त्रीला पर्याय नसायचा,
शाळेचा युनिफोर्म थोरल्याकडूनच मिळायचा
तिन्हीसांजेला घरी परतणं सक्तीच होतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || ८ ||

वळचणीत चिमण्यांच्या पिढ्या नांदायाच्या
पोपटांचा थवा झाडावर विसावायचा,
कुत्रा, मांजर, डुकरानी गाव भरलेला असायचा -
उंदीर, डास, ढेकुण यांचे सार्वभौम्य राज्य होतं..
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || ९ ||

पुस्तकातले प्राणी अचानक रानात दिसायचे
घाबरगुंडी उडाली तरी ते आपलेच वाटायचे,
उरलेले प्राणी नंतर पेशवेपार्कात भेटायचे -
नॉनवेज खाणं हे तर माहितीच नव्हतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १० ||

शाळेत अभ्यासाला खूप महत्व होतं
नंबरावर बक्षीस/छड्या यांचं प्रमाण ठरत होतं,
कॉपी, गाईड, क्लासेसना तिथे स्थानही नव्हतं
वशिल्याने पास होणं माहितीच नव्हतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || ११ ||

गावची जत्रा  हीच एक करमणूक असायची -
चक्र-पाळण्यात फिरण्यात मजा मिळायची,
बुढ्ढीके बाल, गाठीशेवेची तोंडलावणी व्हायची
विमानातला फोटो काढणं चमत्कारिक होतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १२ ||

गावाबाहेरच जग हिरवागार असायचं
सगळ्या नद्यांचे पाणी स्वच्छच असायचं,
पावसाळ्यात ढगांनी आकाश भरायचं,
प्रदूषण, पर्यावरण वगैरे माहितीच नव्हतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १३ ||
 

हुतुतू आट्यापाट्याचा खेळ गल्लीत चालायचा
क्रिकेटच्या मॅचेस चाळीत व्हायच्या,
बापू नाडकर्णी, चंदू बोर्डेच्या गोष्टी रंगायच्या
डे-नाईट, ट्वेंटी- २० चं नावही नव्हतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १४ ||

प्रवास झालाच तर एस्टीनेच व्हायचा
गचके, ठेचकाळणे याला अंत नसायचा,
होल्डाॅल सोबत फिरकीचा तांब्याही लागायचा
लक्झरी, फर्स्टक्लास एसीचं नावही नव्हतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १५ ||

दिवाळी खऱ्या अर्थाने दिवाळी होती
चमनचिडी, पानपट्टी, भुईनळ्या यांची रात्र होती,
रंगीत तेल, उटणे, मोती साबणाची ऐश होती
लाडू, चकल्या, करंज्या यांचे दर्शन वार्षिकच होतं..
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १६ ||

जुनाट रेडिओतून आकाशवाणी बरसायाची
बिनाका गीतामालेने बुधवारची रात्र सजायची,
रेडीओ सिलोनने तारुण्याची लज्जत वाढायची
ताई, नाना हरबा यांच्या इतकच बालोद्यान होतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १७ ||

खाण्याच्या बाबतीत भेदभाव केला जायचा
दादाच्या ताटात जास्त शिरा पडायचा,
पानात टाकणाऱ्याच्या पाठीत रट्टा बसायचा
हॉटेलात जाणं तर पूर्ण निषिद्ध होतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १८ ||

मामाच्या गावाला कधी जाणं-येण होतं
धिंगामस्ती करायला तिथं  नॅशनल परमिट होतं,
विहिरीत पोहायला तिथेच मिळत होतं
भाऊबिजेला आईच्या ताटात फारस पडत नव्हतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || १९ ||

घरातले पुरुष कर्तेसवरते असायचे
बायांना दुपारी झोपणे माहिती नसायचे,
पोराबाळाना गोडधोड सणावारीच मिळायचं
प्रायव्हसीला तिथे काडीचंही स्थान नव्हतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || २० ||

पाव्हणे रावळे इ.चा घरात राबता असायचा
सख्खा, चुलत, मावस असा भेदभाव नसायचा,
गाववाल्यानाही पंक्तीत सन्मान असायचा
पंक्तीत श्लोक म्हणणं मात्र सक्तीचं होतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || २१ ||  

आज घराऐवजी लक्झुरीयस फ्लॅट आहे
मोपेड, स्कूटर, मोटारचा सूळसुळाट आहे,
टीव्हीवर शंभर वाहिन्यांचा दणदणाट आहे
फास्टफूड, पार्ट्या, ड्रिंक्स याना सन्मान आहे,
कौटुंबिक सुसंवादाची मात्र वानवा आहे || २२ ||

आज मुलांसाठी महागडी शाळा-कॉलेजेस आहेत
दूध, बूस्ट, काॅम्प्लानचा भरपूर मारा आहे,
क्लास, गाईड, कॅल्क्यूलेटरची ऐशच ऐश आहे
कपडे, युनिफोर्म क्रीडासाहित्य हवे तितके आहे,
बालकांच्या नशिबी मात्र  पाळणाघर आहे || २३ ||

आज पतीला ऑफिसात मरेस्तोवर काम आहे
सुशिक्षित पत्नीला करियरचा हव्यास आहे,
एक्स्ट्रा अॅक्टीविटीजना घरात सन्मान आहे
छंद, संस्कार यांच्यासाठी क्लासेस उपलब्ध आहे,
आजीआजोबांना मात्र वृद्धाश्रमाचा रस्ता मोकळा आहे || २४ ||

आज घरात प्रचंड आर्थिक सुबत्ता आहे
मागेल ती वस्तू क्षणात हजार होते आहे,
इन्स्टालमेंट, क्रेडीट कार्डचा सूळसुळाट आहे
सध्या बाय वन गेट वनचा जमाना आहे..
म्हणून
पैशांवर  समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे....
पैशांवर  समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे. || २५ ||

आरंभ : मार्च २०२०

संपादक
Chapters
आरंभ अंक
संपादकीय (निमिष सोनार)
संपादकीय (मैत्रेयी पंडित)
बातम्यांच्या जगात – वैष्णवी कारंजकर
अमेरिकेतील मराठी माणूस – नीला पाटणकर
मातृभाषा म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नव्हे! – आशिष कर्ले
शॉर्ट फिल्म: अँरेंज्ड मॅरेज: लग्नाकडे नेणारा एक सुंदर प्रवास - मिलिंद कोलटकर
रात्रींबद्दलची गोष्ट! – अमृता देसर्डा
अंतरद्वंद्व नाटक परीक्षण - अमृता देसर्डा
२०२०: नवीन सिनेमे,नवीन शक्यता,नवीन आशा - निखील शेलार
नागराज मंजुळे: माणूसपण बहाल करणारी दृष्टी - निखील शेलार
द विचर: पोलंडचा महानायक ! – अक्षर प्रभु देसाई
टोलकेन आणि मिडल अर्थ, लॉर्ड ऑफ द रिंग्स , हॉबिट इत्यादी – अक्षर प्रभु देसाई
|| प्रवासवर्णन ||
हम्पी: एका साम्राज्याची अखेर – अजित मुठे
गाथा गुलशनाबादची - मैत्रेयी पंडित
मिस बुम्बुम: ब्राझीलमधील अनोखी सौंदर्य स्पर्धा - सुलक्षणा वऱ्हाडकर
|| लेख विभाग ||
माई: एक सिंन्धुदुर्ग – किरण दहिवदकर
स्वा. वि.दा. सावरकर: एक धगधगते यज्ञकुंड – वंदना मत्रे
सकारात्मक विचार - सविता कारंजकर
मायमाखली नजर – प्रसाद वाखारे
आमची माती, आमची मिसळ - नवनीत सोनार
आम्ही मैत्रिणी - अनुष्का मेहेर
एक स्त्री – प्रिया भांबुरे
वृध्दाश्रम: गरज की अपरिहार्यता – नीला पाटणकर
|| कथा ||
आगंतुक – सविता कारंजकर
|| कविता विभाग ||
तरीही माझं जीवन सुखाचं होतं – अविनाश हळबे
भाव अंतरीचा – छाया पवार
स्वप्नीच्या फुला – योगेश खालकर
आई कुठे काय करते ? – विलास गायकवाड
सून माझी लाडाची – नीला पाटणकर
शोध – मंगल बिरारी
लिखाणाचे सूत्र – दिपाली साळेकर / खामकर
सुख – भरत उपासनी
चार शब्द स्नेहाचे: प्रसाद वाखारे
|| आरंभचे लेखक आणि आरंभच्या टीमचा परिचय ||