Get it on Google Play
Download on the App Store

वृध्दाश्रम: गरज की अपरिहार्यता – नीला पाटणकर

वृध्दाश्रम गरज की अपरिहार्यता ? हा एक गहन विषय आहे.वृध्दाश्रम हा वृध्दासाठी शाप की वरदान न म्हणतां ती एक काळाची सोय,गरज कांहीही म्हणू शकता.कांहींना ती खरोखर निकडीची गरज असते.मुनष्या पासून प्राण्यां पर्यंत प्रत्येकालाच आपले स्वत:चे असे व्यक्ती स्वातंत्र्य हवे असते.जो तो आपापल्या परीने जगत असतो.विचार,वागणे,राहणे यासाठी स्वतंत्र पेस हवी असते.कालानुरूप ते योग्य ही आहे.पूर्वी एकत्र कुटुंब पध्दती होती.त्यामुळे एक दोन तरी वयस्कर वृध्द व्यक्ती घरात असायची.त्यांचे अनुभव,मत विचारात घेऊन,शिरसावंद्य मानले जायचे.त्याच्या विषयी आदरयुक्त दरारा ठेऊन त्यांना मानाने वागवले जायचे.त्याच्या आधाराची घरातील प्रक्येकाला जरूर वाटायची.त्यांची सर्व आनंदाने सेवा शुश्रुषा करायचे.त्यात कुणाला वावगे वाटायचे नाही.आता विभक्त कुटुंब पध्दतीत तरूणांना वेळ नसतो.आपली मत मांडण्याचा आधिकार आपल्याला आहे असे त्यांना वाटू लागले आहे.पूर्वी वृध्दांच्या अनुभवच्या शिदोरीचा तरूण पिढी वापर करून घ्यायची.आता तरूणांना विचार वेगळ्या मार्गाने मांडण्याची कला म्हणा सामर्थ्य आले आहे.आत्मसन्मान आत्मसात करण्याची प्रवृत्ती जागी झाली आहे.अशावेळी रूणानुबंध कुठे तरी विस्मृतीत हरवून गेलेत की काय अस कधीतरी मनाला चाटुन जात.

मोबाईल,फोन,इंटरनेट,विमानसेवा यामुळे जग इतक जवळ आलय.की आपण अनेक कोसावर

असलेल्या व्यक्तींशी बोलूं,व पाहूं शकतो.पण एकत्र राहुन जे एकमेकांचे प्रेम लागत,हवंहवंस वाटते ते ओघानेच कमी झालय.नकळत दुरावा निर्माण झालाय.आस्था,आपुलकी हे शब्द कालबाह्य झाल्यात जमा

आहेत.जे घडतच नाही तिथे मनाची ओढ कशी काय वाटणार ? कुठेतरी ते शोधण्याचा प्रयत्न मात्र न कळत चालूं असतो,ते कुणालाच कळत नाही.नवे विचार,नवी विचारसरणी,दोन पिढ्यांतील अंतर वगैरे बोलले जाते  पण खरच हे असे आहे कां? याचा खोलवर विचार करायला सुध्दा तरूणपिढीला वेळ नाही.

जग यांत्रिक होत चाललंय ,नवे तंत्रज्ञान झेप घेऊ लागलेय ही नक्कीच चांगली गोष्ट आहे.

यातून माणूस दूर कुठे तरी जाऊ लागलाय.नवीन महागड्या गोष्टींचे आकर्षण निर्माण झालय.यात दोष कुणाचाच नाही.ना जुन्या पिठीचा ना नव्या पिढीचा.तरूण व वृध्दांनी समन्वय घडुन आणला तर कांहीच कठीण नाही.सामंजशाने प्रश्न सोडवणे सुलभ असल तरी या धकाधकीच्या व धावपळीच्या स्पर्धेच्या जगात

तो विचार करायला सुध्दा तरूणांना वेळ नाही.याची प्रकर्षांने खंत वाटते.हे मात्र तितकेचं खरे आहे.तरूणांची जीवाच्या आकांताने ध्येय गाठण्याची मनीषा चालूं असते.कायम टिकुन राहण्याची सतत धडपड व मेहनत सुरूं असल्यामुळे घराकडे स्रि व पुरूष दोघांनांही बघायला वेळ नसतो.त्यांचा दृष्टीकोन बदललाय यांत गैर मानावे की नाही हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे.त्यापेक्षा प्रत्येकाने आपले आयुष्य कसे समृध्द करून जगायचं त्याचे अगोदरच नियोजन करणे क्रमप्राप्त होईल.

अशावेळी वृध्दांना वृध्दाश्रमाची नितांत आवश्यकता असते.कोणती ही नवी संकल्पना अमलात यायला वेळ हा लागतोच.ती रूजायला समाजाकडून मान्यता मिळायला थोडा कालावधी जातो.जो तो आपापल्या ठिकाणावर योग्य असतो.त्यासाठी आपला मार्ग सुलभ व्हायला वृध्दांनी चार पावलं पुढे व

तरूणांनी चार पावलं मागे जावे.आणि दोघांचे ही मार्ग सुकर करावे.हे सांगणे जितके सोपे आहे तितके

भावनिक पातळीवर अमलांत आणणे कठीण आहे.परदेशात हा विचार जोमाने रूजलेला आहे.परदेशीयांचे नको ते विचार व नकोत्या इतर अयोग्य गोष्टींचे आपण अंधानुकरण करतो.पण ही गोष्ट मान्य करायला मन धजत नाही.जिव्हाळा व आपुलकीचे बंध आपले इतके खोलवर रूजलेले असतात की ते आपल्याला तस करू देत नाही.आजी-आजोबांचा जीव नातवंडात अडकलेला असतो.तस म्हटल तर चहुंबाजुनी झालेली ती कोंडी असते.त्यातून मार्ग काढण एक दिव्यच अाहे.नातवंडांना ही आजी-आजोबांची छत्रछाया हवी हवीशी

असते.

पूर्वापार आपल्या भारतीयांची चालत आलेली एकत्र कुटुंब व्यवस्था संस्कृती व लहानपणा पासून मनावर घडलेले चांगले संस्कार याला कारणीभूत आहेत.आपल्या माणसाला दूर लोटायला मन कबूल नसत भारतीय माणूस कुटुंबवत्सल व समाज प्रिय आहे.आता ती कांही अंशी न राहील्याने प्रश्न निर्माण झालाय. पोटापाण्या साठी गावोगाव बदल्या होणे.नोकरी निमित्त व शिक्षणा साठी परदेशागमन होणे.यामुळे प्रेम संबंध दुरावले जाऊ लागलेत.जास्त काळ एकत्र राहील्याने जिव्हाळ्याचे संबंध आपोआप निर्माण होतात.

हीच गोष्ट परदेशी सहज मान्य करून आचरणात आणतात.कारण त्यांची संस्कृती व मानसिकता त्याला

पोषक असते.तरी पण " वारा येईल तशी पाठ फिरवणे " हे सामोपचाराचे वाटते." कालाय तस्मैय नम: "

हेच बरोबर आहे.

दोन पिढीच्या विचारांच्या तफावतीत वृध्दांनी आपले पुढील आयुष्य आपल्या वैचारिक निष्ठा

बाळगुन भावनीक न होता योग्य वेळी बाजुला होऊन,आपल्या आवडी-निवडी,सोयीनुसार जपून,आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.आर्थिक बळ कमी असेल तर त्याचे साह्य गरजेनुसार नक्कीच घ्यावे.वैचारिक

पातळींवर झुंज देत बसण्यापेक्षा ही समृध्द तडजोड केव्हांही बळकट आहे.

कांही स्वाभिमानी वृध्दांना लादलेले बांडगुळ होऊन ओझे होणे,पसंत नसत. अशावेळी वृध्दाश्रमाची योजना रास्त वाटते.व पुढच्या पिढीला स्वातंत्र्य दिल्याच समाधान मिळेल.आणि त्यांना ही स्वातंत्र्याच व्यक्ती स्वातंत्र मोकळेपणाने उपभोगता येईल.या मागे ही एकमेव विचार व संकल्पना आहे.

आजकाल सर्रास घरटी एक तरी मुल परदेशात स्थायिक झालेल असत.( कांही वेळा दोन्ही ही ) जीवनांत दोघा जोडीदारा पैकी कुणी तरी आधि जाणार हा निसर्ग नियम आहे. तो तर आपण बदलु शकत नाही.आयुष्याच्या उतरंडीवर साथीदार जाण्याच दु:ख एकलेपणाच असत.अशावेळी मागे

राहणारा वृध्दत्वाच्या व्याधीसह हे कटुसत्य काल्पनिक साखरेत घोळुन पचवत असतो.तरी हरकत नाही,

अशी मनोधारणा व मनोधैर्य कष्टाने ठेवावे लागते.विचारांची प्रगल्भता व समतोल ठेऊन, जन निंदेकडे

दुर्लक्ष करून पुढील वाट सुखकर करण्यास वृध्दाश्रम हा एकमेव मार्ग आहे. त्यात गैर काय आहे ?फक्त

पुढील दृष्टिकोनातून आजारपणा विषयीच्या सुख सोयी पाहुनच पाऊल ठेवण्याच्या निर्णय घ्यावा.आणि

आपल उर्वरीत आयुष्य चिंतामुक्त जगण्याचा प्रयत्न केला असे मनाला समजवावे.मानसिकता व निकड याचा ताळमेळ साधुन यावा लागतो.जग काय म्हणेल याचा विचार करण्यापेक्षा मी काय करतोय हे जगाला दाखवून द्यावे यातच सर्वांचे भले आहे.आपल्याला हितकर व काय सोयीचे आणि योग्य आहे ते बघावे.त्यात स्वत: सकट सर्वांचा आनंद दडलेला आहे असे वाटते.

आरंभ : मार्च २०२०

संपादक
Chapters
आरंभ अंक संपादकीय (निमिष सोनार) संपादकीय (मैत्रेयी पंडित) बातम्यांच्या जगात – वैष्णवी कारंजकर अमेरिकेतील मराठी माणूस – नीला पाटणकर मातृभाषा म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नव्हे! – आशिष कर्ले शॉर्ट फिल्म: अँरेंज्ड मॅरेज: लग्नाकडे नेणारा एक सुंदर प्रवास - मिलिंद कोलटकर रात्रींबद्दलची गोष्ट! – अमृता देसर्डा अंतरद्वंद्व नाटक परीक्षण - अमृता देसर्डा २०२०: नवीन सिनेमे,नवीन शक्यता,नवीन आशा - निखील शेलार नागराज मंजुळे: माणूसपण बहाल करणारी दृष्टी - निखील शेलार द विचर: पोलंडचा महानायक ! – अक्षर प्रभु देसाई टोलकेन आणि मिडल अर्थ, लॉर्ड ऑफ द रिंग्स , हॉबिट इत्यादी – अक्षर प्रभु देसाई || प्रवासवर्णन || हम्पी: एका साम्राज्याची अखेर – अजित मुठे गाथा गुलशनाबादची - मैत्रेयी पंडित मिस बुम्बुम: ब्राझीलमधील अनोखी सौंदर्य स्पर्धा - सुलक्षणा वऱ्हाडकर || लेख विभाग || माई: एक सिंन्धुदुर्ग – किरण दहिवदकर स्वा. वि.दा. सावरकर: एक धगधगते यज्ञकुंड – वंदना मत्रे सकारात्मक विचार - सविता कारंजकर मायमाखली नजर – प्रसाद वाखारे आमची माती, आमची मिसळ - नवनीत सोनार आम्ही मैत्रिणी - अनुष्का मेहेर एक स्त्री – प्रिया भांबुरे वृध्दाश्रम: गरज की अपरिहार्यता – नीला पाटणकर || कथा || आगंतुक – सविता कारंजकर || कविता विभाग || तरीही माझं जीवन सुखाचं होतं – अविनाश हळबे भाव अंतरीचा – छाया पवार स्वप्नीच्या फुला – योगेश खालकर आई कुठे काय करते ? – विलास गायकवाड सून माझी लाडाची – नीला पाटणकर शोध – मंगल बिरारी लिखाणाचे सूत्र – दिपाली साळेकर / खामकर सुख – भरत उपासनी चार शब्द स्नेहाचे: प्रसाद वाखारे || आरंभचे लेखक आणि आरंभच्या टीमचा परिचय ||