Get it on Google Play
Download on the App Store

समुद्राच्या लाटा नेहमीच किनाऱ्याकडे का येतात? त्याच्या विरुद्ध दिशेने का जात नाही?

थोडक्यात सांगायचे तर, समुद्राच्या लाटा किनाऱ्याच्या दिशेने येत नसतात, तर त्या एका विशिष्ट दिशेने प्रवास करत असतात. जर 'लाटा फक्त किनाऱ्याच्या दिशेने येतात' हा समुद्राच्या लाटांचा नियम असता तर खोल समुद्रात हरवलेले आणि वाट चुकलेले व्यक्ती लाटांच्या मागोमाग सहजच किनाऱ्याकडे जाऊ शकले असते. सोबत दिलेल्या चित्रामध्ये किनाऱ्याशिवाय विविध दिशेने जाणाऱ्या लाटा आपण पाहू शकता.

https://qphs.fs.quoracdn.net/main-qimg-2c3f5facd62042ff2df997a2fa6c6d76

आता थोडं स्पष्टीकरण देऊन सांगतो, समुद्राच्या लाटा समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागावर फिरणाऱ्या वाऱ्याद्वारे तयार केल्या जातात आणि पृष्ठभागाच्या पाण्यात उर्जेच्या लहरी निर्माण होईपर्यंत ढकलत असतात. जेव्हा कमी दाबाच्या क्षेत्राजवळ उच्च दाब हवेची आंशिक हवा असते, तेव्हा वारे तयार होतात आणि दोन दाबांच्या बरोबरीसाठी उच्च दाब असलेली हवा कमी दाबाच्या क्षेत्राकडे सरकते. वाऱ्याचा हा प्रकार म्हणजे समुद्राची झुळूक (sea breeze), ही झुळूक जवळच्या पाण्यावरील हवेपेक्षा जमिनीच्या उष्ण हवेमुळे तयार होते. ज्यामुळे हवेचा दाब कमी होऊन उबदार हवा वाढते. समुद्राच्यावरील थंड हवा जमिनीवर वाढणारी उष्ण हवा बदलण्यासाठी जमिनीच्या दिशेने वाहते. जेव्हा जमिनीवरील हवा समुद्राच्या हवेपेक्षा जलद गतीने थंड होते तेव्हा जमिनीवरील झुळूक (land breeze) तयार होते.

एक वारा (समुद्राची झुळूक) किनाऱ्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे, तर दुसरा (जमिनीची झुळूक) किनाऱ्याच्या विरुद्ध दिशेने. एक लाटांना किनाऱ्याच्या दिशेने ढकलते, तर दुसरी लाटांना किनाऱ्याच्या विरुद्ध दिशेने. या लाटा समुद्राखालील जमिनीची हालचाल, भूकंप, वादळ अशा अनेक कारणांनी देखील निर्माण होतात.

https://qphs.fs.quoracdn.net/main-qimg-676a6eb74da4e4df30c3b6596854b75a

व्हाईट कॅप लाटा

समुद्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि जमीनीजवळील वेगवेगळ्या ठिकाणी तयार झालेल्या एकाधिक दिशेने फिरणार्‍या लाटांचा मोठा गोंधळ होतो. समुद्राच्या बाहेर तुम्ही वेगवेगळ्या दिशानिर्देशांमधून लहरी सहजपणे एकमेकांवर आदळताना आणि व्हाईट कॅप तयार करतांना पाहू शकता. कधीकधी लाटांची गती इतर लाटांच्या गतीसोबत एकरूप होऊन तीव्र होतात, ज्यामुळे खोट्या लाटा (Rogue Waves) उद्भवतात. खोल समुद्रात प्रवास करणाऱ्या नाविकांना आणि कप्तानांना कल्पना असते कि, अशा लाटा कोणत्याही दिशेने येऊ शकतात.

https://qphs.fs.quoracdn.net/main-qimg-24ed0e9434a5356123dc5eea263363aa

पाण्यातून जात असताना खोल पाण्यातील बहुतेक लाटा केवळ सहज लक्षात येण्यासारख्या असतात. जर त्या किनाऱ्यापासून दूर जात असतील किंवा किनाऱ्याला समांतर असतील तर त्या खोल पाण्यातच राहतात. ज्या लाटा किनाऱ्याच्या दिशेने प्रवास करतात, त्या जमिनीच्या दिशेने जात असताना पाणी हळू हळू उथळ होण्यामुळे लहरीचा वरचा भाग खाली असलेल्या पाण्यापेक्षा वेगवान होण्यास सुरवात करतो, ज्याचे घर्षण मर्यादित असते.

अखेरीस, लाटांचा वरचा भाग ओसरतो, ज्यामुळे लाट ‘ब्रेक’ होते. ही क्रिया लहरी अतिशय दृश्यमान करते, जे सहजपणे आपल्या लक्षात येईल. वेगवेगळ्या कारणांमुळे लाट विशिष्ट अंतर पार केल्यानंतर वेगवेगळ्या दिशांमध्ये पसरते.

किनाऱ्याचं दिशेने जाणाऱ्या लाटा तयार होण्यासाठी बराच काळ जातो आणि त्या लाटा बरेच अंतर पार करून जमिनीच्या दिशेने आलेल्या असतात.हळू हळू वाहणाऱ्या (समुद्राची झुळूक) वाऱ्यामुळे त्या एकाच दिशेने जात असतात. सतत एकाच दिशेने प्रवास होत असल्याने त्यांचा वेग वाढतो आणि त्या तीव्र होत जातात. त्या तुलनेने किनाऱ्यावरून समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या लाटांची 'लाट' म्हणून नुकतीच सुरुवात झालेली असते. पण प्रचंड अंतर पार करून आलेल्या लाटांसमोर त्यांचा टिकाव लागत नाही आणि त्या तिथल्या तिथेच थांबतात. म्हणून आपण किनाऱ्यावरून बघितले असता आपल्याला फक्त किनाऱ्याच्याच दिशेने येणाऱ्या लाटा दिसतात. सोबत छायाचित्रात दिलेल्या लाटेची तीव्रता पहा, किनाऱ्यावरून तयार होणाऱ्या लाटेला लाट होण्याची संधीही देत नाहीत त्या.

विज्ञानामागील सायन्स

अभिषेक ठमके
Chapters
विज्ञानामागील सायन्स © अभिषेक ज्ञानेश्वर ठमके लेखकाचे मनोगत न्युझीलँड येथील वेटोमो गुहेच्या चमकण्याचे रहस्य काय आहे? कोलंबिया येथील कैनो क्रिस्टल्स या रंग बदलणाऱ्या नदीचे रहस्य काय आहे? चंद्र आणि सूर्याभोवती रिंगण का पडते? पृथ्वीचा तिसरा ध्रुव कुठे आहे? जपानमधील 10 हजार वर्षापुर्वी समुद्रात बुडलेले योगागूनीचे विशाल शहर खरंच अस्तित्वात होते का? पनामा कालवा - आधुनिक जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणारी नाईल नदी आजूबाजूला वाळवंट असताना देखील आटली कशी नाही? ज्वालामुखी त्सुनामी म्हणजे काय? आइसलँड येथील हौकडलूर दरीतील गिझर आहे तरी काय? मोबाईल कॅमेऱ्याने चंद्राची छायाचित्रे स्पष्टपणे का येत नाहीत? तुर्की या देशात पामुक्कलेमध्ये हजारो वर्षांपासून गरम पाण्याचे झरे कसे काय आहेत? समुद्राच्या लाटा नेहमीच किनाऱ्याकडे का येतात? त्याच्या विरुद्ध दिशेने का जात नाही? सूर्य एक तारा आहे का? वेगवेगळ्या ग्रहांवर वस्तूंचे वजन भिन्न का असते? घड्याळात क्वार्ट्झ (Quartz) का लिहिलेले असते? 'मोनो ट्रेन' आणि 'मेट्रो ट्रेन' यात काय फरक आहे? मनुष्य प्राणी अंतराळात जास्तीत जास्त किती दिवस राहू शकतो? सूर्याची उत्पत्ती कशी झाली? त्याचे आयुष्य किती वर्षांचे आहे? सूर्यापासून सर्वात जवळ आणि दूर कोणता ग्रह आहे? आकाशातील तारे आणि उपग्रह कसे ओळखावे? अंतराळात कोणत्या ग्रहांची एस्केप व्हेलॉसिटी सर्वात जास्त व सर्वात कमी आहे? आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (इंरनॅशनल स्पेस स्टेशन) पृथ्वी भोवती भ्रमण का करते? भारतात रॉकेट आणि अवकाशयान कोठे बनवतात? सॅटेलाईटच्या प्रक्षेपणाच्या वेळी त्याच्याभोवती सोनेरी कागद का लावतात? पृथ्वीपासून मंगळ ग्रहाचे अंतर किती आहे? अंतराळात ऑक्सिजन नसताना देखील सूर्य कसा जळत आहे? कधी कधी मोबाइल वरून क्रॉस कनेक्शन कसे लागते? निळ्या रंगाचं केळं खरंच अस्तित्वात आहे का? 5G तंत्रज्ञान पक्ष्यांसाठी घातक आहे का? शुक्र ग्रहावर वसाहत करणे कसे शक्य आहे? विमान प्रवासाने ग्लोबल वॉर्मिंग होते का? टायटॅनिक जहाज का बुडाले? समुद्रातील काही गुढ रहस्य समुद्रातील काही गुढ रहस्य: रामसेतू समुद्रातील काही गुढ रहस्य: मृत समुद्र जिथे माणूस बुडत नाही समुद्रातील काही गुढ रहस्य: मेरी क्लेस्टे जहाज समुद्रातील काही गुढ रहस्य: किनाऱ्यावरील निळा प्रकाश समुद्रातील काही गुढ रहस्य: मिल्की सी समुद्रातील काही गुढ रहस्य: एलियन्सचे अस्तित्व समुद्रातील काही गुढ रहस्य: योनागुनी तटावरील अवशेष समुद्रातील काही गुढ रहस्य: 19 फूट लांब शार्कवर हल्ला समुद्रातील काही गुढ रहस्य: समुद्रकिनाऱ्यावरील पायांचे पंजे समुद्रातील काही गुढ रहस्य: क्युबा येथील समुद्राखालील शहर समुद्रातील काही गुढ रहस्य: रहस्यमयी ममी समुद्रातील काही गुढ रहस्य: पृथ्वी अर्ध्यापेक्षा जास्त काळोखात आहे समुद्रातील काही गुढ रहस्य: पृथ्वीवरील सर्वाधिक ज्वालामुखी समुद्रातील काही गुढ रहस्य: समुद्रापेक्षा मंगळाचे नकाशे अधिक स्पष्ट समुद्रातील काही गुढ रहस्य: सर्वात मोठ्या समुद्राच्या लाटा समुद्रातील काही गुढ रहस्य: पृथ्वीवरील सर्वात मोठा धबधबा समुद्रातील काही गुढ रहस्य: 70% पेक्षा जास्त ऑक्सिजन पुरविणारे वनस्पती समुद्रातील काही गुढ रहस्य: स्क्विड समुद्रातील काही गुढ रहस्य: चंद्राप्रकाशाचा प्रजननावर परिणाम