श्री दशभूज सिद्धी लक्ष्मीगणेश जांभूळपाडा रायगड
रायगड जिल्ह्यातील खोपोली पाली याचा रस खोपोली पाली रस्त्यावर पाताळगंगा नदीकाठी वसलेले हे श्री दशभूज सिद्धी लक्ष्मी गणेश मंदिर आहे.
जांभूळपाडा या गावात पूर्वीपासूनच हे मंदिर आहे. प्रसिद्ध महड-पाली या अष्टविनायकांच्या मध्ये हे गाव आहे.
१९८९ या साली येथे महाप्रलय झाला व मंदिर आणि गाव उद्ध्वस्त झाले पण गणेशाची मूर्ती सुरक्षित राहीली.
ग्रामस्थांनी नंतर मंदिराची डागडुजी केली.
भोर संस्थानातील जांभूळपाडा या गावाची मूल मूळ मालकी खरे म्हणजेच दीक्षित यांची होती. त्यांच्या घरातही या देवाची प्रतिकृती आहे.
या मंदिरातील मूर्ती भव्य पुरातन आणि दशभुजाधारी आहे.