Get it on Google Play
Download on the App Store

प्रास्ताविक

मित्रांनो, ही कथा एका रहस्यमय डायरीची आहे, या डायरीमध्ये फक्त तीन दिवसांचा म्हणा खरंतर तीन रात्रीचा तपशील लिहिला गेला आहे, परंतु त्या तीन रात्रींचे तपशील इतके भयानक आणि डिस्टर्ब करणारे आहेत, मला अनेक वेळा विचार करावा लागला कि या डायरीच्या पानांमधला तपशील तुमच्यापर्यंत पोहोचावावा की नाही? याचा विचार मी बरेच दिवस केला आणि खूप वेळा विचार केल्यावर वाटले की हॉरर स्टोरी ऐकण्याची आवड असलेल्या माझ्या मित्रांसाठी हा एक वेगळा अनुभव असेल. एक पूर्णपणे नवीन प्रकारची कथा तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे,  वाचल्यानंतर तुम्हाला ही कथा कशी वाटते ते कमेंट बॉक्समध्ये सांगा.

या डायरीच्या पानांमध्ये  लिहिणाऱ्या व्यक्तीच्या अत्यंत वेदनादायक क्षणांचे काही भाग असले तरी, कदाचित या क्षणांबद्दल जाणून घेतल्यास, आपण हे समजू शकतो की भूतांचे अस्तित्व ही केवळ कल्पना नाही तर ती आपल्या सर्वांच्या जीवनाप्रमाणेच सत्य आहे.आत्म्यांच्या जगात, त्यांच्या अस्तित्वासाठी कोणतीही कालमर्यादा नसते, त्यांच्या अस्तित्वाचा कोणताही उद्देश नसतो, कोणतेही नाते नसते, कोणतीही आशा नसते, केवळ कधीही न संपणारी दीर्घ प्रतीक्षा असते आणि त्यांच्या मृत्यूचे जे काही रहस्य असेल ते प्रत्येक वेळी त्याच्याबरोबरच दफन केले जाते.

माझ्या एका पोलीस मित्राला ही गोष्ट ज्या शब्दात सानिकाच्या डायरीत लिहून ठेवलेली मिळाली होती, त्याच शब्दात मी तुम्हाला हि सांगतोय...