Get it on Google Play
Download on the App Store

दुसरी नोंद

डायरी, तारीख २५ मे १९९१  

पहिला दिवस

वेळ रात्री ९.४० वाजता

थोड्याच वेळात काहीतरी विचित्र घडले, आंघोळ करून जेवणाच्या टेबलावर पोहोचले, तेव्हा मला दिसले की टेबलावर ठेवलेले सर्व अन्न कोणीतरी किचवडून ठेवले होते, फक्त एक दोनच चपात्या शिल्लक होत्या. त्या मी झटकून ताटात काढल्या आणि खाल्ल्या कारण भूक खूप लागली होती. ज्युलीने पाण्याने भरून ठेवलेला जग आणि ग्लास जमिनीवर पडले होते. काचेच्या ग्लासचे तुकडे तुकडे झाले होते

पण माझ्याशिवाय इथे कोणीच नाही आणि मी बाथरूममध्ये होते तेव्हा या बंद घरात कोण आणि कसे घुसले असेल कळत नाही, जोपर्यंत मी आत होते तोपर्यंत मला कोण बाहेर असल्याचा आवाजही ऐकू आला नाही. मी खूप घाबरले आहे

मात्र याबाबत यावेळी कोणाशी बोलावे, यावेळी जवळचे दुकान सुद्धा बंद झाले असेले, त्यामुळे  कोणालाही फोन करणे कठीण आहे. असं वाटतंय की या घरात माझ्याशिवाय अजून कोणीतरी आहे ज्याला मी पाहू शकत नाही पण अनुभवू शकते. मला वाटतं चादर पांघरून शांतपणे झोपलेलं बरं. आजसाठी गुड नाईट!