Get it on Google Play
Download on the App Store

सातवी नोंद

डायरी, तारीख २८ मे१९९१ ,

तिसरा दिवस

दुपारी २.३० वाजता

मी तिच्याशी बोलता बोलता कोसळले कशी ते मला कळलेच नाही.आह...पोटात दुखतय तिने बहुतेक माझ्या पोटात चाकू खुपसला होता. हा धक्का माझ्यासाठी खूप मोठा आहे, मी वेदनेने बेशुद्ध होत आहे. मला अंधुकसे आठवते ज्युली मला माझ्या रूम मध्ये ओढत होती. शर्लीने माझी फसवणूक कशी केली? मला समजत नाही की मी काय चूक केली?

शिवाय योगायोगाने जेव्हा मी आरशाजवळ उघडी ठेवलेली या डायरीची पाने पाहिली तेव्हा मला त्या विचित्र दिसणार्‍या इंग्रजी भाषेचे रहस्य समजले.

"इरेह मोर्फ ओग" Go from here म्हणजे इथून निघून जा.

या काळात जेव्हा मी इथून निघून गेले नाही तर

"डूफ यूऔय एकम लवी हटेईड" Death will make you food म्हणजेच मृत्यू तुम्हाला अन्न बनवेल

"ईरह इवेइल टनैक यूऔय", You can't leave here याचा अर्थ तुम्ही येथून जाऊ शकत नाही

"नूस ईड लवी यूऔय" You will die soon म्हणजे, तू लवकरच मरणार आहेस,

त्यानंतर काय झाले मला माहीत नाही, आता दुपारचे २.३० वाजले आहेत आणि माझ्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी जखमा झाल्यासारख्या वाटत आहेत. पायाची बोटे, पोटऱ्या, मांड्या, दंड, कान, नाक असा  प्रत्येक अवयव ठणकत आहे.  जखमांतून सतत रक्तस्त्राव होत आहे, माझ्यात आता लिहिण्याची ताकद नाही, मी कदाचित सकाळपर्यंत जगू शकणार नाही, सर्व बाहेर पडण्याचे मार्ग बंद आहेत. या खोलीत खिडक्या, दारे, भिंती इत्यादी सगळीकडे माझ्या रक्ताच्या खुणा आहेत. मी खिडकीची काच फोडण्याचा आणि ही डायरी बाहेर फेकण्याचा प्रयत्न करते