Get it on Google Play
Download on the App Store

भाग-१

एक रहस्यमयी वाडा! असे म्हणतात की एखादा माणूस एकदा तिथे गेला तर तो कधीच परत येत नाही. पण सोनियाला मात्र तिकडे जायचे होते . त्या वाड्याचे अनाकलनीय गूढ उकलायचे होते. कारण तिचे वडील डॉ.आशिष पेडणेकर संशोधनासाठी गेले होते, ते कधी परत आलेच नाहीत. सोनियाचा भाऊही वडिलांच्या शोधात गेला आणि त्याने जीव गमावला.

सोनिया त्यावेळी खूपच लहान होती. तिने नेहमी तिची आईला एकटी बसून गुपचूप तिचा भाऊ कौस्तुभ आणि तिच्या वडिलांचा फोटो मोबाईल मध्ये पहात पहात ओक्साबोक्शी रडताना पहिले होते. पण आता सोनिया मोठी झाली होती आणि तिला तिच्या वडील आणि भावाच्या मृत्यूचे कारण शोधायचे होते. मात्र यासाठी तिची आई आकांक्षा तिला परवानगी देत ​​नव्हती. कारण तिला आपली मुलगी गमवायची नव्हती.

“सोनिया, दूध पी आणि झोप जा, खूप रात्र झाल्ये..”

आकांक्षा सोनियाच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली.

“आई तू झोप जा, माझं  प्रोजेक्ट अजून पूर्ण झालं नाहीये....”  सोनिया लॅपटॉपवर बोटं चालवत म्हणाली.

आकांक्षाने जाऊ लागली आणि जाता जाता तिने आपल्या मुलीकडे कटाक्ष टाकला पण सोनिया मात्र तिच्या कामात खूपच मग्न होती. आकांक्षाला तिच्या मुलीकडून गुड नाईट ऐकायचे होते, पण सोनियाचं आजीबात लक्ष नव्हतं.

आकांक्षा झोपायला गेली. सोनियाचा पाळीव कुत्रा टफी त्याच्या बेडवरून खाली उतरला आणि सोनियाचे पाय चाटू लागला.

“टफी, झोप जा....” सोनिया रागाने म्हणाली.

टफी धावत आकांक्षाच्या रूम मध्ये गेला जिथे आकांक्षा तिची डायरी लिहीत होती, टफीला बघून तिने तिची डायरी बंद केली आणि तिने त्याला आपल्या कुशीत बोलावले आणि त्याला कुरवाळत झोपी गेली.