Get it on Google Play
Download on the App Store

भाग -११

त्या सर्वांनी त्या पलीकडच्या खोलीत प्रवेश केला आणि त्या खोलीची पाहणी सुरू केली.

"हा व्हिंटेज कंदील बघ आणि भिंतीवरचे ते सुंदर चित्र पाहिलंस? " रिया मेणबत्तीच्या मंद प्रकाशात तिच्या नजरेला ताण देत म्हणाली.

“हा कंदील कसा वापरायचा, त्यात रॉकेल नाहीये” राजेशने कंदील हलवला आणि तो म्हणाला.

अचानक आकांक्षा जोरात ओरडली आणि तिने राजेशला घट्ट पकडले. सगळे आश्चर्यचकित होऊन विचारु लागले कि काय झाले?

इतक्यात अचानक कंदील पेटला आणि राजेशच्या हातून सुटून त्या खोलीतल्या एका कपाटाकडे उडत गेला. सर्वांनी वर पहिले. आता त्यांच्या डोळ्यांवर त्यांचा विश्वास बसत नव्हता. खोलीच्या कोपऱ्यात एका कपाटाच्या वर काळ्या कपड्यात एक स्त्री बसलेली  दिसली. जी शांत बसली होती आणि तिचा चेहरा रक्ताने माखलेला होता. ती दात विचकून हसली मग तिने कंदिलाकडे पहिले आणि त्या सर्वांकडे टक लावून पाहू लागली.

ते सर्वजण भीतीने दाराकडे धावले आणि त्यांनी दार जोरात ढकलले, दार उघडल्यावर ते सर्वजण बाहेर आले आणि त्यांनी एकमेकांचा हात घट्ट धरला.

मग सोनिया किंचाळली “टफी कुठे आहे? टफीs!”

“देवा, आमचे रक्षण कर” रिया म्हणाली.

मग कंदील खोलीतून बाहेर आला आणि एका भिंतीवर लटकला .त्यांनी घाबरून आजूबाजूला पाहिले कारण त्यांना वाटले की ती स्त्री आता त्यांच्यासोबत त्या खोलीतच आहे.

“तो बघ, टफी”

आकांक्षा रडत रडत म्हणाली आणि पुढे निघाली. तेवढ्यात सोनिया आणि राजेश  दोघांनी आकांक्षाला थांबवले आणि विचारले

"टफी? कुठे आहे?"

आकांक्षाने घाबरत वर बोट करून दाखवले.. त्यांनी वर पाहिले आणि ते दृश्य पाहून ते चरकले आणि त्यांनी देवाचा धावा सुरु केला.

वरच्या फॅनवर ती स्त्री टफीला कुरवाळत बसली होती.