भाग -१०
“राजेश, कुठे आहे?” इकडे तिकडे बघत सोनिया म्हणाली?
“बाळा, तो जरा पुढे गेलाय बघायला कुठे बाहेर जायचा रस्ता सापडतो का ...” आकांक्षा आपल्या मुलीच्या कपाळावर हात फिरवत म्हणाली.
"टफी इकडे ये, बाळा" सोनियाने टफीला प्रेमाने मिठी मारली.
“सोनिया तू…” राजेशच्या हातातून हातोडा पडला आणि तो एकदम आनंदित झाला.
"या मॅडम सुध्दा तिथूनच खाली पडल्या आहेत, जिथून आपण सगळे." रियाने हातोडा उचलून हाती घेतला आणि म्हणाली.
“राजेश, मला माहीत होतं तुला काहीही होणार नाही.” सोनियाने राजेशचा हात हातात घेतला.
“हो सोनिया, तुझा विश्वास होता त्याप्रमाणे आम्ही सर्व ठीक आहोत, तू खूप डेरिंगबाज आहेस...” राजेशने सोनियाला प्रोत्साहन दिले.
"आता आपण सगळ्यांनी काय करायचं? मला खूप भूक लागली आहे, टफीलाही भूक लागली आहे” रिया उदासपणे म्हणाली.
आकांक्षा हसत म्हणाली, “बॅग बघ, बाळा, माझ्या कडे बिस्किटे आणि फळे आहेत.
मग त्या अंधाऱ्या गुहेत सर्वांनी बिस्किटं आणि फळं खाऊन पाणी प्यायलं.
“आता आपण इथून कसे बाहेर पडायचं आणि इथे भुताखेरीज कोणीच नाही. बाय द वे सोनिया सॉरी पण, काका आणि दादा इथेही दिसले नाहीत, त्यांचे मृतदेह सुद्धा सापडले नाहीत आणि आपण सगळे इथे अडकून पडलो आहोत. रस्ता शोधतोय पण इथून बाहेर पडणे अवघड आहे.’ रिया सोनियाकडे बघत म्हणाली.
आता आकांक्षाच्या हृदयाचे ठोके वाढू लागले होते, रियाच्या बोलण्याने ती खूपच दुखावली गेली होती. तिचा नवरा आणि मुलगा इथेच मरण पावले हे तिला माहीत होतं. पण इतक्या वर्षात तिला इतका मन:स्ताप झाला नव्हतं जितका रियाच्या बोलण्यामुळे झाला. तिने आता आशाच सोडून दिली होती.
"हो, खरं आहे माझी नजर सुद्धा फक्त त्या दोघांनाच शोधत आहे." असं म्हणून आकांक्षा रडू लागली.
"आई, रडू नकोस ऐक! जेव्हा आपण इथे आलो तेव्हा आपल्याला काही वाईट शक्ती जाणवल्या. इथे कदाचित वाईट आत्मे असतीलही पण जर बाबा आणि दादा इथे आले होते आणि लोकांच्या म्हणण्यानुसार ते मेले होते, तर मग त्यांचे मृतदेह कुठेत ? आणि मला सांग, जर इथे येणारा माणूस कधीच परत जात नाही, तर मग त्या हिशोबाने इथे मृतदेहांचा ढीग लागायला हवा होता, ते सगळे मृतदेह कुठे आहेत?” रियाच्या हातात टफीला सोपवत सोनिया म्हणाली.
राजेशने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, "सोनिया तुझं बरोबर आहे."
“तुम्हा सर्वांच्या एक गोष्ट लक्षात आली का? हे भुयार वाड्याइतके अस्वच्छ नाही. इथे तितकी घुसमटसुद्धा होत नाही? आणि ते दुष्ट आत्मे आपल्याला इथे त्रास देत नाहीत.'' गुहेची पाहणी करताना सोनिया म्हणाली.
"मला वाटतं की आपल्याला सकाळची वाट पाहावी लागेल. एवढ्या अंधारात आपण काय करू शकतो?” रिया म्हणाली.
“नाही.... मला वाटते आपण वरच्या मजल्यावर जाऊन सगळं बघायला हवं,” सोनिया पाठीवरची बॅग पुढे घेऊन त्यातून काहीतरी बाहेर काढत म्हणाली.
ते तिघेही ताडकन उठून उभे राहिले आणि ते सोनियाकडे आश्चर्याने पाहत होते.
“आपण जिथून जीव वाचवून इथे आलो आहोत त्याच झपाटलेल्या ठिकाणी तुला परत जायचंय?” आकांक्षा सोनियाकडे पाहत रडत म्हणाली.
"हे बघ, इथेही आपण सुरक्षित नाही आहोत. तुला असं वाटतंय की इथे काहीच नाहीये, पण मला असं वाटतय कि काही वेळातच इथे एखादी दुर्घटना घडेल, म्हणून आज रात्रीच इथून बाहेर पडण्याचा मार्ग शोधून काढायचा आहे.” सोनिया बॅगमधून माचिस आणि मेणबत्त्या काढत म्हणाली.
"टॉर्च कोणाकडे आहे?" सोनियांनी विचारले.
" आमच्या हातून टॉर्च वाड्यातच खाली पडला." रिया म्हणाली.
जेव्हा सोनियाने माचीस आणि मेणबत्ती पेटवली तेव्हा संपूर्ण भुयारात प्रकाशाचे अद्भुत दृश्य होते. समोर भिंतीवर पडदा लावला होता. जेव्हा सोनियाने तो पडदा बाजूला काढला तेव्हा त्याच्यामागे एक आरसा होता, ज्यामध्ये तुम्ही बघितले तर तुम्हाला तुमचे प्रतिबिंब दिसत नाही.
राजेश म्हणाला, "मी हे आधीच पाहिले आहे, मला खूप भीती वाटते हे पाहून. रिया तर बेशुद्ध पडली होती."
आरशाकडे बघत सोनिया म्हणाली, या आरशाचा इथे काय उपयोग? इथे या तुम्ही. तो आरसा काढून बघूया कदाचित काहीतरी सापडेल.”
आरसा काढताच त्याच्या मागे एक छोटा दरवाजा होता.
"अरे व्वा सोनिया, तू तर कमालच केलीस, आम्ही इतका विचारच केला नव्हता.” राजेश खुश होऊन म्हणाला.
मग राजेशने हातोड्याने दरवाजा तोडला आणि मेणबत्तीच्या उजेडात बघितले तर एक खोली दिसली. ,