Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण विसावे

दुसऱ्या दिवशी पहाटे दररोजप्रमाणे सनईवर भैरवी वाजवली गेली.

संपूर्ण वाड्यातील लोक निद्रिस्त अवस्थेत संत रामदासांचे मनाचे श्लोक ऐकत असत.

मना सज्जना भक्ती पंथेचि जावे
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे
जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे
जनी वंद्य ते सर्व भावे करावे

सोबतच मंदिरातील घंटा आणि चिपळ्या झांज देखील वाजत असत.

नव्या जमीनदारीण बाई शरयूदेवी रोज पहाटे स्नानाला कुंडावर वैजयंतीला घेऊन जात असत. त्यादिवशी उठल्यावर त्यांच्या कक्षाला कुलूप दिसले. कुलूप बाहेरून लावलेले होते. त्यांना आश्चर्य वाटले.

“हे कसे शक्य आहे? वाड्यातील स्त्रियांच्या शयनकक्षाला कुलूप बंद करण्याचे धाडस कोणी केले आहे.”

त्या त्यांचे पती विश्वप्पा चुडामणी हेब्बर यांच्याकडे गेल्या. विश्वाप्पा म्हणजे व्यंकटअप्पया चूडामणी हेब्बार यांचे ज्येष्ठ पुत्र. त्यांची पत्नी शरयुदेवी साधारण वैजयंतीच्या वयाचीच होती.

"आजपासून सकाळची आंघोळ बंद करावी लागेल का?" शरयूदेवी यांनी विचारले.

"का?" विश्वप्पा चुडामणी हेब्बार यांनी त्यांच्याकडे झोपेत असताना आश्चर्यचकित होऊन विचारले.

"स्त्रियांच्या शयन कक्षाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप बंद आहे."

"कुलूप बंद आहे? तुम्ही काय बोलत आहात?” विश्वप्पा आश्चर्याने पलंगावर उठून बसले.

"चुडामणी हेब्बार घराण्याच्या वाड्यात एकही दरवजा कधीहि कुलूप बंद केला गेला नाही आणि स्त्रीशयन कक्षाचे  दार बंद असणे केवळ अशक्य आहे. कारण तेथे २४ तास पहारा असतो."

"जा आणि स्वतःच पाहा ना?" विश्वप्पा चुडामणी हेब्बर अंथरुणातून उठला आणि वडील व्यंकटप्पय्या चुडामणी हेब्बार यांच्या खोलीसमोर पोहोचला. दरवाजा बंद होता. विश्वप्पा चुडामणी हेब्बार परतला. त्याला दारातच बळी  उभा दिसला. विश्वाप्पा बळीच्या अंगा खांद्यावर खेळला होता त्यामुळे त्यांच्यात जिव्हाळा होता. त्यांना विश्वप्पाने विचारले,

"अप्पा अजून उठले नाहीत, बळी काका?"

“नाही,बाबा” बळी  

"पण ते रात्रभर का जागत का होते? विश्वाप्पा

"मी हे सांगू शकत नाही. पण ते अनेक वेळा रात्रीचे चामुंडा मंदिरात गेले होते. जेव्हा ते परत आले तेव्हा ते रागावलेले होते. लाल लाल झाले होते. आल्यावर बराच वेळ ते रागावून दारू पित होते."

“काय कारण असेल, बळी काका?” असे म्हणत विश्वप्पानी विचार केला आणि मागे वळताच दार उघडण्याचा आवाज आला.

"अप्पा, स्त्रियांच्या शयनकक्षाला कुलूपबंद करण्याची आज्ञा आपण दिली आहे का? काय झालंय? आज तुम्हाला बरे वाटत नाही का?"

"मी ठणठणीत आहे आणि होय तो आदेश मीच दिला आहे."

"ठीक आहे" असे म्हणून विश्वप्पा त्याच्या कक्षात परतला.

ते कोड्यातच पडले होते. पण विशेष कारण नसते तर व्यंकटअप्पय्या यांनी असा आदेश कधीच दिला नसता. त्यांना ही गोष्ट समजली.

रात्र झाली. डामरनाथाचा गोड आवाज थंड हवेच्या लाटांवर तरंगत आला आणि वैजयंतीच्या कानावर पडला. लागला. वैजयंती लक्षपूर्वक गीत ऐकत होती. वसंत बहार हा राग सुरू झाला. वैजयंती तयार होऊन बाहेर निघाली  तिने सोबत डामरनाथाच्या चरणांना लावण्यासाठी रक्तचंदन उगाळून घेतले. तसेच त्याची आवडती अनंताची फुले घेतली. इतक्यात कालिका म्हणाली

"ताई सरकार! आज सर्व दारांना कुलूप आहे.

"मग मी जाऊ कशी?"

"मी ठरवलं होतं की मी जाणार नाही. पण तो गोड आणि मृदू आवाज मला आणि माझ्या आत्म्याला वेड लावतो.” वैजयंती  

“आता या सगळ्या गोष्टी करणं बंद करा, ताई सरकार. गावात बरीच कुजबुज सुरू आहे. तुमची आणि डामरनाथाची विनाकारण बदनामी केली जात आहे, मोठे सरकार यांना आता संशय आला आहे. तुम्ही कृपया अमावस्येच्या रात्रीशिवाय मंदिरात जाऊ नका, अन्यथा तुम्हाला दोघांनाही त्रास होऊ शकतो.”

“पण कालिका! हे जगणं मला आता असह्य झालंय. मला आता हा खोटा अभिनय आवडत नाही! तरुण भिक्षूने माझे मन आणि माझ्या आत्म्याला वेड लावले आहे. जेव्हा मी त्याचे संगीत ऐकते तेव्हा माझे चित्त थाऱ्यावर रहात नाही. तुलाही माझी अवस्था कळत नाही का?"

कलिकेच्या मांडीवर डोकं ठेवून वैजयंती रडू लागली.

“मला समजते, ताई सरकार!” कलिका वैजयंतीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली.

“अखेर मी पण एक स्त्री आहे. मलाही मन आहे. मात्र समाजाचे नियम पाळावेच लागतात.”

"समाज शरीराचे बाह्य आवरण पाहतो आणि अंतरंग पाहत नाही. त्या साधूची करुणामय आर्त हाक ऐक. नकळतपणे तो रोज रात्री असे आमंत्रण देतो. कलिका, असे कर, तू माझ्या ऐवजी जा आणि माफी मागून सांग की वैजयंती बंदीवान आहे. एक ना एक दिवस ती नक्की येईल. तुम्ही त्या दिवसाची वाट बघा.”

कलिकेला पाठवून वैजयंती आत कक्षात गेली. खिडकीचे गज धरून उभी राहिली आणि डामरनाथाचे गायन ऐकत राहिली. त्याच्या दुःखी आत्म्याचे रुदन ऐकून वैजयंतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

कलिका भिक्षूला नमस्कार करून म्हणाली-

“महाराज!'

"कोण? कलिका!" “ भिक्षूच्या आवाजात चिंतेचे भाव उमटले.

"आज वैजयंती देवी सायंकाळच्या आरतीला आल्या नाहीत का?"

“नाही, आज त्या कैदी आहेत. संधी मिळताच त्या येतील असा निरोप दिला आहे.”

“कलिका, त्यांना येण्यास मनाई कर.” संन्यासी डामरनाथ बोलला ।

"त्यांना स्वतःला दुसरीकडे मन गुंतवू द्या. त्यामुळेच त्यांना मुक्ती मिळेल. चामुंडा देवीच्या मंदिरात येण्यात काही अर्थ नाही."

"ही संध्याकाळच्या आरतीची सामग्री आहे, महाराज!" कलिका भरून आलेल्या आवाजात बोलली-
"वैजयंती देवीने चरणामृत मागितले आहे."

आरती करून, प्रसाद देऊन कलिकेला संन्यासी निराश स्वरात म्हणाला

"वैजयंतीला सांग की मी तुझ्यामार्फत रोज चरणामृत पाठवीन."

“ठीक आहे” असे म्हणून कालिका वाड्यात परतली.

क्रमश: