Get it on Google Play
Download on the App Store

लोभी माणूस

एका लोभी माणसाने आपला सगळा पैसा शेतात पुरून ठेवला होता. तेथे दिवसातून दोन वेळा जाऊन त्या पुरलेल्या जागेकडे पाहून तो मोठे समाधान मानीत असे. ते त्याचे वागणे त्याच्या नोकराने पाहिले व त्याने तर्क केला की, आपला मालक या जागेकडे नेहमी पाहतो, तेव्हा तेथे काहीतरी पुरलेले असावे. रात्री त्याने तेथे जाऊन खणून पाहिले तर आत बरेच धन त्याला दिसले. ते घेऊन तो पळून गेला. दुसर्‍या दिवशी तो लोभी माणूस नेहमीप्रमाणे तेथे येऊन पाहतो तर सगळे धन चोरीला गेलेले त्याला दिसले. मग तो डोके बडवून घेत रडू लागला. तेव्हा त्याचा शेजारी त्याच्याजवळ येऊन रडण्याचे कारण विचारू लागला. लोभी माणसाने घडलेली हकीकत त्याला सांगितली. ते ऐकून शेजारी म्हणाला, 'अरे मला वाटतं की तसं तुझं काहीच गेलं नाही. आपला पैसा येथेच आहे, असं समजून तू पूर्वीप्रमाणेच या जागेकडे पहात जा म्हणजे झालं.'

तात्पर्य

- लोभी माणसे पैसे असून दरिद्री व अशांना पैशाचा उपयोग न होता दुसरेच कोणीतरी त्याचा उपयोग करून घेतात. जवळ असलेला पैसा वापरायचा नाही तर तो चोरीला गेल्यावर शोक करण्यात काय अर्थ ?

इसापनीती कथा ५१ ते १००

इसाप
Chapters
शहाणा गाढव सागवान वृक्ष आणि काटेझाड फासेपारधी व पक्षी पक्षी आणि पारधी मूर्ख लांडगा म्हातारा व मृत्यू म्हातारा आणि त्याचा घोडा म्हातारा व दारूचे पिंप एक माणूस व त्याचा मूर्ख नोकर लोभी माणूस लठ्ठ कोंबडी व बारीक कोंबडी कुत्रा आणि लांडगा कोल्हा आणि रानडुक्कर कोकीळ आणि ससाणा खेड्यातला उंदीर व शहराला उंदीर काटे खाणारे गाढव कासव आणि बेडूक घुबड आणि टोळ घोडा आणि सांबर गरुड आणि कासव गरुड आणि चंडोल गाडीवाला गाडीचे चाक देव आणि साप अस्वल आणि मधमाशा आजारी सांबर आळशी तरुण माणूस वकील आणि सरदार वाकडे झाड उंदराचे सिंहाशी लग्न सिंह आणि उंदीर शेतकरी आणि नदी स्वैपाकी व मासा प्राणी, पक्षी व मासे पोपट आणि ससाणा मोर आणि बगळा म्हातारा आणि तरुण वांव मासा व साप कोल्हा आणि द्राक्षे कोल्हा व बोकड कारकून व कारभारी चाकावरील माशी बोका आणि कोल्हा बैल आणि लाकूड अरण्य आणि लाकूडतोड्या उंदीर आणि बैल शेतकरी आणि ससाणा शेतकरी आणि रानडुक्कर ससा आणि चिमणी पेटीतला उंदीर पाण्यात पाहणारे सांबर