कोल्हा व बोकड
एक कोल्हा एका विहीरीवर पाणी प्यायला गेला असता विहिरीत पडला. त्याने विहिरीतून वर येण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग होईना. इतक्यात तेथे एक बोकड आला व कोल्ह्याला म्हणू लागला, 'अरे, हे पाणी चांगलं का ?' कोल्हा त्यावर म्हणाला, 'अरे मित्रा, पाणी किती चांगलं आहे म्हणून सांगू ? अगदी अमृताइतकं गोड पाणी आहे हे. कितीही प्यालं तरी माझं समाधान होत नाही.' हे ऐकताच बोकडाने आत उडी मारली. त्याची शिंगे मोठी होती, त्याच्यावर पाय देऊन कोल्हा उडी मारून लगेचच विहिरीतून बाहेर आला व बिचारा बोकड पाण्यात गटांगळ्या खात बुडून मरण पावला.
तात्पर्य
- कोणतीही गोष्ट लोक स्वार्थासाठी करतात, मग दुसर्याचा नाश झाला तरी चालेल. म्हणून जो कोणी लालूच दाखवेल त्या माणसाच्या प्रामाणिकपणाबद्दल पूर्ण खात्री करून घेतल्याशिवाय त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ नये.