Get it on Google Play
Download on the App Store

स्वप्नफल- भूमी संबंधी (Marathi)


रुद्रमुद्रा रमेश अणेराव
स्वप्न सर्वांनाच पडतात असे समजले जाते. स्‍वप्‍ने न पडणारा माणूस लाखात एखादा असेल. तरीही काही लोकं छाती ठोकपणे सांगतील की, “आम्हाला स्वप्न पडतच नाहीत बिछान्यावर पडल्यावर गाढ झोप लागते.” पण हे खरे नाही. स्‍वप्‍न न पडणे ही गोष्‍ट अश्‍यक्‍य आहे. आपल्या आरोग्‍याच्‍या दृष्‍टीनेही माणसाला स्‍वप्‍न पडणे चांगलेच आहे. माणसाला स्‍वप्‍नं पडायला हवीत. आपल्या स्‍वप्‍नाची दुनिया ही खरोखरच अकल्पनीय असते. स्वप्न किती वेगळी आणि अत्भुत असतात याची अनुभूती कधीतरी आपल्याला आलेली असते. माणसाला पडणारी स्‍वप्‍नं कधी आनंद देणारी असतात तर काही स्‍वप्‍नं भय निर्माण करणारी पण असतात. काही माणसे स्‍वप्‍नात काहीतरी भयंकर प्रसंग पाहून किंचाळून उठतात. मनाच्या एका गाभाऱ्यात हे खेळ चालूच असतात. रात्री आपले शरीर झोपलेले असते त्यामुळे मनामध्ये शरीराची आणि मनाची अशी दुहेरी ताकद एकवटली जाते. त्यामुळेच कि काय मनाच्‍या विचारशक्‍तीचा वेग अधिक होतो. यामुळे मेंदूला चांगलीच चालना मिळते. आपले विचारचक्र खूप वेगाने काम करू लागते त्यामुळे आपल्याला स्‍वप्‍नं पडतात. यावेळी ही दुहेरी शक्‍ती काम करते त्‍यामुळे जे विचार येतात ते माणसाला बहुतेकदा भविष्‍याची वाट दाखवतात. आपल्यावर आलेल्या किंवा पुढे येणाऱ्या संकटाचे निर्मुलन कसे करावे याचेही मार्गदर्शन करतात. काही वेळा स्‍वप्‍नं सांकेतिक असतात. त्‍याचा अर्थ आपल्याला लागत नाही. आपल्‍या पूर्वजांनी स्‍वप्‍नाच्या अर्थाचे काही ठोकताळे मांडले आहेत. हे ठोकताळे त्‍यांनी स्वानुभवावरून तयार केले असावेत. भारतात आपल्या वेद पुराणामध्ये माणसाला पडणाऱ्या स्वप्नानाचे काही अर्थ लावले आहेत. हे काही लेखात व पुराणात लिहिले गेले आहेत. हे साहित्य अनुभवाने परिपक्‍व व संपूर्ण आहे. त्‍याचा सखोल अभ्यास झाला आहे. यातले काही भाग या पुस्तकांत मांडले आहेत.
READ ON NEW WEBSITE