Get it on Google Play
Download on the App Store

विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5

१८. भांडवलवाल्यांची राष्ट्रें मागसलेल्या राष्ट्रांपेक्षां जरी सुसंपन्न आहेत, तरी त्यांच्यावर एक मोठेंच संकट ओढवलेलें दिसतें. या राष्ट्रांतील इंग्लंड व फ्रान्स हीं दोन राष्ट्रें शक्य होता तेवढा मुलूख लाटून बसलीं आहेत. जर्मनीच्या वाट्यांला आफ्रिकेंतील थोडासा मुलूख आला होता; पण जर्मनांची संख्या तर सारखी वाढत होती. जपानच्या वाढत्या बळामुळें व युरोपियन राष्ट्रांच्या आपसांतील दुहीमुळें जर्मनीला सारा चीन देश काबीज करतां आला नाहीं. अर्थात् जर्मनीचा डोळा फ्रान्सच्या आणि इंग्लंडच्या वसाहतींवर वळला; आणि त्यामुळेंच गेल्या महायुद्धाचा प्रसंग ओढवला. आजला जपान एकामागून एक चीनचे लचके तोडीत चालला आहे; व मुसोलिनी अबिसिनियाला सुधारण्यासठीं सज्ज झाला आहे. य लाटालाटीमुळें भांडवलवाल्या राष्ट्रांत प्रेम उत्पन्न होणें अशक्य झालें आहे; आणि त्यासाठीं सर्व राष्ट्रांना युद्धाची जय्यत तयारी ठेवावी लागत आहे. कधीं कोठें युद्धाचा वणवा पेटेल याचा नेम नाहीं. इकडे दुसर्‍या राष्ट्रांशीं युद्ध उत्पन्न होण्याचें भय, व तिकडे खालच्या वर्गाचे लोक क्रान्ति करतील हें भय, अशा दोन भयांच्या कात्रींत हीं राष्ट्रें सांपडलीं आहेत. भयभीत राष्ट्राला किंवा माणसाला सुख कोठून मिळणार?

१९. बोल्शेव्हिकांना क्रान्तीचें भय नाहीं. कारण रशियांतील दलित वर्गाचा बोल्शेव्हिक राज्यव्यवस्थेनें खास फायदा झाला आहे. सध्या जर कोठें बेकारी नसेल, तर ती रशियांत; इतर सर्व देश कमीजास्ती प्रमाणानें बेकारीनें गांजलेले आहेत. आणि हें रशियन मजुरांना माहीत आहे तरी रशियाहि भयापासून मुक्त नाहीं. पूर्वेच्या बाजूला जपानचा डोळा बोल्शेव्हिकांच्या मुलुखावर आहे; आणि पश्चिमेला तर सर्व भांडवलवाल्यांचें जगच त्यांच्या विरुद्ध आहे. अशा परिस्थितींत सुखसोईचीं साधनें निर्माण करण्याऐवजीं बोल्शेव्हिक युद्धाचीं साधनें विशेषत: विमानें-झपाट्यानें वाढवीत आहेत. आगगाड्या बरोबर न चालल्यामुळें रशियांतील गिरण्यांना मालाचा पुरवठा वेळेवर होत नाहीं; खाणींत यंत्रसामग्री भरपूर नसल्यामुळें कोळसा काढणें तहकूब ठेवावें लागतें; परंतु विमानें बांधण्याचें आणि इतर युद्धसामग्री उत्पन्न करण्याचें काम मात्र झपाट्यानें चालू आहे.

२०. ह्या युद्धाच्या भावी संकटांतून पार पडण्याची बहुतेक आशा राहिली नाहीं. मुत्सद्दी लोक आजचा प्रसंग उद्यांवर ढकलतात, एवढेंच कायतें. शांतिपर्वांत एका माणसाची गोष्ट आहे. तो एका भयानक जंगलांत सांपडला. त्यांतून बाहेर निघण्यास त्याला वाट मिळेना. सिंह, व्याघ्रादिक हिंस्त्र प्राण्यांच्या भयानें तो इतस्तत: धांवूं लागला. त्या वनांत लतांनी व गवतानें झाकलेली एक मोठी विहीर होती. धांवतां धांवतां हा गृहस्थ त्या विहीरींत पडला, व लतांमध्ये गुरफटला जाऊन अधांतरीं लोंबकळत राहिला. त्या विहीरीच्या कांठीं असलेल्या वृक्षावर मधाचें पोळें होतें. त्यांतून कांहीं मधाचे थेंब गळूं लागले. तेव्हां जीभ बाहेर काढून हा गृहस्थ ते थेंब चाटूं लागला! ही उपमा १  कांहीं अंशीं युरोपीय भांडवलावाल्यांना लागू पडेल. भांडवलशाहीनें उत्पन्न केलेल्या लतांच्या जाळ्यांत ते लोंबकळत आहेत. एकीकडे दुसर्‍या महायुद्धानें भांडवलशाहीच्या लता तुटण्याचें भय, व दुसरीकडे गिरण्यांच्या पोळ्यांतील मजूररूपी मधमाशा खाऊन टाकतील हें भय, अशा ह्या दोन भयांत सांपडले असतांहि त्या पोळ्यांतून गळणारे थोडेबहुत फायद्याचे थेंब ते चाटीतच आहेत! ह्या संकटांतून पार पडण्याचा मार्ग त्यांना निखालस दिसत नाहीं !
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१ कुंभकोण संस्करण, अ. २०५. आम्ही येथें मूळ उपमेंत थोडा फेरफार केला आहे.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हिन्दी संस्कृति आणि अहिंसा

धर्मानंद कोसंबी
Chapters
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 1 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 2 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 3 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 4 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 5 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 6 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 7 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 8 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 9 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 10 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 11 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 12 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 13 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 14 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 15 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 16 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 17 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 18 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 19 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 20 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 21 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 22 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 23 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 24 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 25 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 26 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 1 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 2 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 3 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 4 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 5 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 6 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 7 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 8 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 11 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 13 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 14 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 15 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 17 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 18 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 19 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 20 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 23 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 24 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 1 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 2 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 3 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 5 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 6 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 8 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 9 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 11 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 12 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 14 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 15 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 16 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 17 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 18 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 19 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 20 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 21 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 22 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 23 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 24 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 25 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 26 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 27 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 28 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 29 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 30 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 31 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 32 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 33 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 34 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 35 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 39 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 40 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 41 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 42 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 43 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 44 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 45 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 47 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 48 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 49 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 50 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 51 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 52 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 53 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 55 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 57 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 59 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 60 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 62 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 63 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 68 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 69 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 1 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 5 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 7 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 8 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 9 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 11 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 14 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 16 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 1 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 2 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 6 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 8 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 10 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 11 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 12 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 13 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 14 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 15 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 16 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 17 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 18 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 19 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 20 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 21