Get it on Google Play
Download on the App Store

विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7

२५. “भिक्षुको, कामोपभोगांची आसक्ति सोडून देण्यानेंच मनुष्य त्यांपासून मुक्त होतो. ( केवळ बाह्यात्कारी कामोपभोगांचा त्याग केला, तर त्यांपासून मुक्ति मिळते असें नाहीं.)”

२६. त्यानंतर दुसरें एक महत्त्वाचें ‘कामसुत्त’ नांवाचें सुत्त सुत्तनिपातांत आहे. तें बरेंच प्राचीन असून त्याच्यावर महानिद्देसांत विस्तृत टीका केलेली आढळते. यासाठीं तें समग्र येथें देण्यांत येत आहे.

कामं कामयमानस्स तस्स चे तं समिज्झति ।
अद्धा पीतिमनो होति लद्धा मच्चो यदिच्छति ।।१।।
तस्स चे कामयानस्स छन्दजातस्स जन्तुनो ।
ते कामा परिहायन्ति सल्लविद्धो व रुप्पति ।।२।।
यो कामे परिवज्जेति सप्पस्सेव पदा सिरो ।
सोमं विसत्तिकं लोके सतो समतिवत्तति ।।३।।
खेत्तं वत्थुं हिरञ्ञं च गवस्सं दासपोरिसं ।
थियो बन्धू पुथू कामे यो नरो अनुगिज्झति ।।४।।
अबला नं बलीयन्ति मद्दन्ते नं परिस्सया ।
ततो नं दुक्खमन्वेति नावं भिन्नमिवोदकं ।।५।।
तस्मा जन्तु सदा सतो कामानि परिवज्जये ।
ते पहाय तरे ओघं नावं सित्वा व पारगूति ।।६।।

( विषयांची इच्छा करणार्‍याची जर ती इच्छा तृप्त झाली, तर इच्छित वस्तूचा लाभ झाल्यामुळें त्याला खरोखरच आनन्द होतो ।।१।। पण विषयोपभोगांत त्या प्राण्याची वासना दृढमूल झाली, आणि त्या उपभोग्य वस्तु नष्ट झाल्या, तर तो बाणानें विद्ध झाल्याप्रमाणें दु:ख पावतो ।।२।। सर्पमुखापासून जसा आपला पाय आपण दूर ठेवतों, तसा जो दूरूनच कामोपभोग वर्ज्य करतो, तो स्मृतिमान् इहलोकीं तृष्णेला जिंकतो ।।३।। शेत, बागबगीचे, धन, गाई आणि घोडे, दास आणि नोकर, स्त्रिया आणि बंधु, अशा प्रकारच्या अनेक कामोपभोगांची जो मनुष्य हांव धरतो, त्याचे अबल प्रतिस्पर्धी बलवान् होतात; व त्याला अनेक विघ्नांची बाधा होते. त्यामुळें फुटलेल्या नावेंत जसें पाणी, तसें त्यांच्या अन्त:करणांत दु:ख शिरतें ।।४-५।। म्हणून प्राण्यानें सदोदित सावधानपणें कामोपभोग वर्जावे. नावेंत शिरलेलें पाणी काढून जसे पार जातात, त्याप्रमाणें कामोपभोग सोडून त्यानें ओघ तरून जावें ।।६।।)

२७. मनुष्याच्या अन्त:करणांत तृष्णेचे अंकूर फुटूं लागतात, तेव्हां ते अत्यंत सुंदर दिसतात; पण तृष्णेचें जंगल माजून जेव्हां तें त्याच्या अन्त:करणाला पछाडतें, तेव्हां त्याच्या जीविताचा समूळ विध्वंस होतो. यासंबंधीं एक उत्कृष्ट उपमा मज्झिम-निकायांतील चूळधम्मसमादान सुत्तांत सांपडते, ती अशी :-  “ग्रीष्म ऋतूच्या अखेरीस मालुवा १  लतेला फळें आलीं, व एक फळ फुटून त्याचें बीज एका शालवृक्षाखालीं पडलें. त्या शालवृक्षावर रहाणारी देवता २  भयभीत झाली. तेव्हां तिच्या आप्तमित्र वनदेवता गोळा होऊन म्हणाल्या कीं, ‘तूं भिऊं नकोस. कदाचित् हें बीज मोर किंवा मृग खाऊन टाकील, अग्नि जाळील, वनरक्षक तें वाढूं देणार नाहींत, वाळवी तें खाईल, किंवा तें फोल निघेल.’
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ ही लता हिमालयाच्या पायथ्याशीं उगवते, व ती ज्या वृक्षावर चढते त्या वृक्षाचा समूळ नाश करते, अशी समजूत होती.
२ देवता हा शब्द जरी स्त्रीलिंगी असला तरी त्याचा अर्थ देव किंवा देवी असा होऊं शकतो. वृक्षाधिष्ठित देवता म्हणजे त्या वृक्षाचा आत्माच म्हणाना. येथें देवता देववाचक आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हिन्दी संस्कृति आणि अहिंसा

धर्मानंद कोसंबी
Chapters
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 1 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 2 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 3 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 4 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 5 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 6 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 7 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 8 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 9 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 10 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 11 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 12 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 13 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 14 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 15 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 16 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 17 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 18 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 19 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 20 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 21 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 22 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 23 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 24 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 25 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 26 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 1 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 2 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 3 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 4 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 5 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 6 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 7 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 8 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 11 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 13 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 14 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 15 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 17 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 18 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 19 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 20 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 23 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 24 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 1 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 2 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 3 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 5 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 6 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 8 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 9 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 11 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 12 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 14 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 15 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 16 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 17 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 18 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 19 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 20 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 21 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 22 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 23 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 24 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 25 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 26 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 27 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 28 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 29 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 30 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 31 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 32 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 33 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 34 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 35 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 39 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 40 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 41 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 42 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 43 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 44 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 45 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 47 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 48 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 49 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 50 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 51 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 52 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 53 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 55 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 57 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 59 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 60 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 62 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 63 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 68 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 69 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 1 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 5 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 7 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 8 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 9 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 11 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 14 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 16 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 1 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 2 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 6 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 8 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 10 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 11 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 12 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 13 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 14 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 15 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 16 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 17 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 18 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 19 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 20 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 21