Get it on Google Play
Download on the App Store

१९३२ - पहिला गुन्हा, पहिला खून


फेब्रुवारी १९३२ ला तुरूंगातून सुटल्यावर बैरो आणि राल्फ फुल्ट्सने एकत्र येऊन एक टोळी तयार केली. ईस्टहोम जेलवर हल्ला करण्या इतपत पैसे आणि दारूगोळा जमवण्याच्या उद्देशाने त्यांनी किराणा दुकानाच्या, गॅस स्टेशनच्या छोट्या मोठ्या चोऱ्या करणं सुरू केलं. १९ एप्रीलच्या एका अयशस्वी चोरीत दोघांना अटक झाली. काही महिन्यांनी गुन्हा सिद्ध झाल्याने पार्कर सुटली पण फुल्टसला शिक्षा झाली. शिक्षा पूर्ण करून फुल्टस सुटला आणि पुन्हा टोळीत सामिल झाला नाही.  ३० एप्रील रोजी हिल्सबोरो, टेक्सासमधल्या एका चोरीत बैरो ड्रायव्हरच्या भुमिकेत होता.

या चोरीत दुकानमालकाला, जे एन बुचेरला, गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला होता. चोरीच्यावेळी बैरो गाडीत बसलेला असूनही मालकाच्या पत्नीने नंतर फोटो दाखवल्यावर त्याची ओळख एक 'खुनी' म्हणूनच सांगितली. ही पहिलीच वेळ होती जेव्हा बैरोवर खुनाचा आरोप होता. पार्करला १७ जूनपर्यंत अटक झाली.

या वेळात ती कविता लिहायची. जेव्हा काऊफमन काऊंटीची जूरी गुन्हा सिद्ध करू शकली नाही तेव्हा तिला सोडून देण्यात आलं. काहीच दिवसांत ती पुन्हा बैरोला भेटली. 5 ऑगस्टला पार्कर तिच्या आईला डलासला भेटायला गेली तेव्हा तिला बैरो, हॅमिल्टन आणि रॉस डायस हे स्ट्रिंगटाऊन, ओक्लाहोमाच्या एका ग्रामनृत्याच्या कार्यक्रमात दारू पीत बसलेले दिसले. तेव्हा शेरिफ सी. जी. मैक्सवेल आणि सहकारी युजीन सी. मूर ह्यांनी त्यांना पार्किंगमध्ये भेटायचा प्रयत्न केला पण बैरो आणि हॅमिल्टनने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

 यात शेरिफ मैक्सवेल  गंभीर जखमी झाले आणि त्यांचा सहकारी मरण पावला. एका पोलिस अधिकाऱ्याचा खून करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती. त्यानंतर त्यांनी जवळपास पोलिस अधिकाऱ्यांना मारलं. 23 मार्च 1933 रोजी बुक्क बैरोला तुरूंगातून सोडून देण्यात आलं. काही दिवसांनंतर तो आणि त्याची बायको ब्लांशे,दोघे मिसूरीत क्लाईड,पार्कर आणि जोन्सबरोबर  एका छोट्या घरात राहू लागले. त्याच्या परिवाराच्यामते ते दोघं फक्त भेटायला गेले होते, ते क्लाईडला सरेंडर करायला सांगत होते.

बोनी क्लाईडची पोलिसांशी पुढची भेट 13 एप्रीलला झाली, जेव्हा आजुबाजूच्या लोकांना त्यांच्या संदिग्ध हालचालींचा संशय आला. घरात लपून बसलेल्या चोरांशी सामना करावा लागेल या संशयाने पोलिस दोन गाड्यांमध्ये पाच पोलिस अधिकाऱ्यांना घेऊन आले.  हल्ला अचानक झाला असला तरी क्लाईड शांत राहिला. त्याने, जोन्स आणि बुक्कने डिटेक्टीव्ह मिक गिन्नीसचा गोळी घालुन खून केला आणि हवालदार हैरीमनला गंभीर जखमी केलं. या मुठभेडीत पार्करने पोलिसांवर गोळ्या झाडल्या. बुक्क, जोन्स आणि क्लाईडलाही गोळ्या लागल्या. ही टोळी पोलिसांच्या तावडीतून तर यशस्वीपणे सुटली पण त्यांचं सगळं सामान तिथेच राहिलं ज्यात बुक्क आणि ब्लांशेच्या लग्नाची कागदपत्रं, बुक्कची पैरोलची कागदपत्रं, बरीच हत्यारं, बोनीने लिहीलेली एक कविता आणि रोल डेव्हलप नं केलेला एक कॅमेरा असं सगळं होतं. तो रोल धुतल्यानंतर बरेच असे फोटो समोर आले ज्यात पार्कर, बैरो आणि जोन्स एकमेकांवर बंदुक रोखून उभे होते. हे फोटो पेपरात छापून आल्यावर अमेरिकेतील पाच अज्ञात चोर 'बैरो टोळी' नावाने प्रसिद्ध झाले. पुढचे तीन महिने ही  बैरोटोळी टेक्ससपासून ते मिनेसोटापर्यंत अनेक गुन्हे करत राहिली.  मे मध्ये त्यांनी लुसरने, इंडिआना आणि ओकबेना, मिनेसोटामधली एक बँक लुटली. ते नेहमी त्यांच्या बंधकांना घरापासून दूर सोडत पण घरी परतण्यासाठी पैसेही देत असत.  'बैरो टोळी' त्यांना आडवे येणाऱ्या कोणालाही गोळी मारण्याआधी विचार करत नसत, मग ते नागरिक असोत किंवा पोलिस अधिकारी. त्यांच्या या क्रुरतेमुळे ते लोकांच्या नजरेतुन पडले आणि हेच त्यांच्या सत्यानाशाचं कारण ठरलं.

त्या फोटोंनी जनतेचं खूप मनोरंजन केलं पण 'बैरो टोळी' हताश आणि असंतुष्ट होती. त्यांच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे त्यांचं पोलिसांपासून वाचणं कठीण होत गेलं. रेस्टॉरंट आणि मॉटेलसारख्या सार्वजनिक ठिकाणी पकडले जाण्याची शक्यता जास्त होती त्यामुळे ते उघड्यावरंच जेवण करत आणि झऱ्यांमधे अंघोळी करत. 10 जूनला पार्कर  आणि जोन्सबरोबर गाडीत जात असताना वेलिॆग्टन जवळच्या एका पुलावरच्या धोक्याच्या सुचना बैरोने नीट वाचल्या नाहीत आणि गाडी दरीत कोसळली. नक्की पेट्रोलमुळे आग लागली कि कारच्या बॅटरीतलं अॅसिड पार्करवर पडलं यात विवाद होते पण जे ही काही झालं त्यात पार्करच्या पायाला तिसऱ्या डिग्रीचे घाव झाले. परिणामी तिच्या पायाच्या पेशी आकुंचन पावल्या आणि तिचा पाय आखुड झाला.  पुढे आयुष्याभर एकतर ती डाव्या पायावर लंगडत चालायची किंवा क्लाईड तिला उचलुन घेत असे.