प्रसारमाध्यमं
- सिनेमा
हॉलिवुडने बऱ्याचदा बोनी व क्लाईडची गोष्ट सादर केली.
१ – १९५८ मधे विलीयम विटनी दिग्दर्शीत 'द बोनी पार्कर स्टोरी' चित्रपटात डोरोथी प्रोवीनने मुख्य भुमिका साकारली होती.
२ - आर्थर पेन ने १९६७ साली या गोष्टीचं सर्वोत्तम रुपांतर सादर केलं ज्यात वारेन वेट्टी आणि फाये दुनावे यांनी मुख्य भुमिका साकारल्या.
-संगीत
१ - डिसेंबर १९६७ मधे सर्ज गैन्स्बौर्ग आणि ब्रिगीत्ते बर्दोतने रेकॉर्ड केलेल्या एका गाण्यात या जोडीला थोडं रोमँटीक पद्धतीने दाखवण्यात आलं, जे १९६८ ला रिलीज़ झालं.या गाण्याचे शब्द बोनी पार्करने लिहीलेल्या एका कवितेतील आहेत.
२ - १९६७ मधे जोरजी फेम ने 'द बेलेड ऑफ बोनी एंड क्लाईड' गाण्यात या जोडीने केलेल्या कारनाम्यांची गोष्य आहे. हे गाणं त्यांच्यावर तयार झालेल्या चित्रपटावर आधरित आहे.
३ - १९६८ मधे मेल तोर्मे ने 'अ डे इन द लाईफ ऑफ बोनी एंड क्लाईड' नावाचं एक गाणं लिहीलं जे त्याच नावाच्या अल्बममधे प्रकाशित झालं.
४ - १९६८ मधे मर्ल हैगार्डने 'द लीजेंड ऑफ बोनी एंड क्लाईड' हे गाणं रेकॉर्ड केलं.
५ - १९९६ मधे जर्मन बंद डाई तोतेन होसेन ने आपला सातवा अल्बम 'ओपियम फुरस वोल्क' मधे 'बोनी एंड क्लाईड' गाणं समाविष्ट केलं.
- संगीत नाटक
- २० नोव्हेंबर २००९ साली ला जोल्ला प्लेहाऊस ने बोनी आणि क्लाईड नाटकाचा पहिला प्रयोग केलं. यात लौरा ओस्नेस आणि सतर्क सेंड्स ने मुख्य भुमिका साकारल्या. या नाटकाला 'सॅन डिएगो थिएटक क्रिटीक सर्कील' पुरस्कार देण्यात आला आणि दिग्दर्शक जेफ्फ काल्हौ ला 'सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकाचा' पुरस्कार मिळाला.
- याच नाटकाचा पुढचे प्रयोग सारासोटा, फ्लोरिडाच्या एसोलो रेपोर्तोरी थिएटरमधे १२ नोव्हेंबर २०१० ते १९ डिसेंबर २०१० दरम्यान आयोजित करण्यात आले. यातही लौरेनने बोनीची भुमिका साकारली पण क्लाईडची भुमिका जेरेमी जॉर्डनने साकारली. ब्रॉडवे वर हे नाटक १ डिसेंबर २०११ ला प्रदर्शित झालं आणि ६९ प्रयोगांनंतर ३० डिसेंबर २०११ रोजी बंद झालं.
टीव्ही-
-टीव्ही सिनेमा बोनी एंड क्लाइड: द ट्रु स्टोरी मधे त्रच्य नीद्हम आणि दाना अश्ब्रुक ने मुख्य भुमिका साकारल्या.
-ब्रुस बेरेस्फोर्डने 'बोनी एंड क्लाईड' नावाची एक लहान टीव्ही मालिका सुरू केली जी ८ व ९ डिसेंबर २०१३ ला लाईफटाईम, हिस्ट्री चॅनेल आणि ए एंड ई वर प्रदर्शित झाली.
- मार्च २००९ मधे या जोडीवर बीबीसी ने 'टाईम वॉच' नावाची मालिका दाखवली ज्यात या जोडीच्या खुणा, पोलिसांची कागदपत्रं, आणि परिवाराच्या आठवणी दाखवल्या गेल्या. क्लाईडने जेलमधे असताना कशी आपल्या पायाची दोन बोटं कापुन घेतली आणि त्याच्या बरोबरच्या एका कैद्याला कसं मारलं हे ही या कार्यक्रमात सांगितलं गेलं.
-बैरो टोळीच्या गुन्ह्यांचा प्रवास अमेरिकन एक्स्पेरिंस च्या 'बोनी एंड क्लाईड' या भागात दाखवला गेला.