१९३३ - प्लेटे सिटी आणि देक्सफीस्ड पार्क
१८ जुलै १९३३ ला ही टोळी प्लेटे शहरातल्या रेड क्राऊन टुरीस्ट कोर्टमधे रहायला गेली. ही टोळी नेहमी सर्वांचं लक्ष वेधुन घ्यायच्या प्रयत्नात असायची. हॉटेल मालक हौसेरच्या लक्षात आलं की ब्लांशे बैरोने गाडीत पाच लोकं असतानाही तीनंच लोकांची नावं लिहीली होती. याशिवाय तिने खोलीचं भाडं देताना नोटांएवजी नाणी दिली ! पुढच्या दिवशी त्याने पाहिलं की त्यांनी त्यांच्या खोल्यांच्या खिडक्यांना पेपर लावले होते. हौसेरने त्याच्या हॉटेलमधे नियमीत येणारा ग्राहक कॅप्टन विलीयम बकस्टरला या टोळीची माहिती दिली. क्लाईड आणि जोन्स मेडिकलमध्ये पार्करच्या पायासाठी औषधं घ्यायला गेले तेव्हा दुकानदाराने शेरिफ होल्ट केफ्फेला याची माहिती दिली आणि त्यांच्या खोलीवर नजर ठेवायला सुरूवात केली. रात्री अकरा वाजता शेरिफ कोफ्फोने आपल्या अधिकाऱ्यांच्या एका गटाच्या मदतीने त्यांच्या खोलीला घेरलं. अंधारात झालेल्या या चकामकीत क्लाईडची बंदुक पोलिसांसमोर फार नाही टिकली. बैरोने बंदुक ठेवली, पोलिसांना हा शांतीचा प्रस्ताव वाटला पण त्यानंतर बैरो गाडी घेऊन पळाले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला नाही. बैरो टोळी पुन्हा एकदा यशस्वीपणे निसटली होती पण बुक्क बैरोच्या डोक्याला गोळी लागली होती आणि ब्लांशेच्या दोन्ही डोळ्यांत काचेचे तुकडे गेल्याने ती जवळजवळ आंधळी झाली होती. पाच दिवसांनी बैरोटोळीने देक्सफील्डजवळ ठाण मांडलं. बुक्क कधी-कधी बेशुद्ध तर कधी-कधी शुद्धीवर असायचा. तरी त्याच्या डोक्याची जखम इतकी खोल होती की क्लाईड आणि जोन्सने त्याला पुरण्यासाठी एक खड्डा खोदुन ठेवला होता. स्थानिक लोकांचं यावर लक्ष गेल्यानंतर पोलिसांना हे बैरो टोळीचे सदस्य असल्याचा संशय आला. स्थानिक पोलिस अधिकारी आणि रहिवास्यांनी त्यांना घेरलं आणि गोळीबार सुरू झाला. क्लाईड, पार्कर, आणि जोन्स तिथुन पळाले. बुक्कला मात्र पाठीत गोळी लागली आणि तो व त्याची बायको पोलिसांकडून पकडले गेले. पाच दिवसांनतर पैरी आयोवाच्या किंग्स डॉटर्स हॉस्पीटलमधे डोक्याला झालेली जखम आणि निमोनियामुळे बुक्कचा मृत्यू झाला.
सप्टेंबरमधे ते डलासला आपल्या कुटुंबाला भेटायला गेले, जोन्स त्यांना सोडून त्याच्या आईला भेटायला हौस्टनला गेला तेव्हा त्याला १६ नोव्हेंबरला पोलिसांकडून अटक करण्यात आली. संपुर्ण शरद ऋतूत क्लाईड बैरो छोट्या मोठ्या चोऱ्या करत राहिला आणि त्याचे आणि पार्करचे कुटुंबीय पार्करच्या तब्येतीची काळजी घेत होते. २२ नोव्हेंबर १९३३ ला कुंटुंबाला भेटण्याच्या प्रयत्नात ते पुन्हा एकदा अटक होता होता वाचले. त्यांच्या शहराचा शेरिफ स्मूट स्च्मिद आपल्या सहकाऱ्यांबरोबर त्यांची वाट पहात होता. बैरो तिथे पोहोचल्यावर त्याला धोका जाणवला. त्याच्यावर स्च्मिद आणि इतर सहकाऱ्यांनी गोळ्या चालवल्या. त्याच्या कुटुंबीयांना इजा झाली नाही परंतू कारमधून एक गोळी बैरो आणि पार्कर दोघांच्या पायाला लागली. पुढच्या आठवड्यात २८ नोव्हेंबरला डलासच्या न्यायालयाने बैरो आणि पार्करविरूद्ध तेरांत परगण्याच्या डिप्टी मल्कोम दावीसच्या खुनाच्या आरोपाखाली वॉरंट काढलं.