ऐतिहासिक दृष्टीकोन
इतिहासकारांनी दशकानुदशके बोनी व क्लाईडच्या लोकप्रियतेचं अवलोकन केलं आहे. ई.आर.मिलनेर- एक इतिहासकार, लेखक आणि बोनी व क्लाईडचे विशेषज्ञ-यांनी या जोडीच्या लोकप्रियतेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या बघितलं आहे. मिलनेर यांच्या मते जे लोक स्वतःला बाहेरचे किंवा सरकारविरोधी समजतात त्यांच्यासाठी बोनी व क्लाईड हे एक असं बाह्यतत्त्व होतं जे निष्काळजी सरकारचा विरोध करत होतं.