भारत आणि अणुशक्ति
भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत या क्षेत्रात भारताची अर्थातच नावालाच प्रगति होती व ती शास्त्रज्ञ पातळीवर. डॉ.होमी भाभा यांच्या प्रभुत्वाखाली भारताने Atomic Energy Commission स्थापन केले. पं. नेहेरूंचा डॉ. भाभांवर पूर्ण विश्वास होता व त्याना पूर्ण स्वातंत्र्य होते. भारतातील अणुसंशोधन व विकास याचा टप्प्याटप्याने जो क्रम त्यानी बांधून दिला त्यानुसार अद्यापहि आपली वाटचाल चालू आहे. मात्र अनेक दिग्गज शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ गेल्या ५०-५५ वर्षात भारताला लाभले आहेत आणि भारताच्या या क्षेत्रातील प्रगतीकडे जगाचे कायम लक्ष असते. B. A. R. C. या ट्रॉम्बे येथील केंद्रापासून (मूळ नाव Atomic Energy Establishment Trombay) भारताची या क्षेत्रातील वाटचाल सुरू झाली.