Get it on Google Play
Download on the App Store

शास्त्रीय माहिती.

 मूलद्रव्ये, elements, म्हणजे काय हे आपणास शालेय काळापासून ऐकून ठाऊक असते. रेडियम वगैरे नावे आपण ऐकलेली असतात. युरेनिअम हा एक जड धातु आहे. निसर्गात तो फार थोड्या प्रमाणात मिळतो. भारतात तर फारच थोड्या प्रमाणात मिळत होता. मुद्दाम शोधाशोध केल्यावर १९६० नंतर त्याची पहिली खाण ओरिसांत जादुगुडा येथे सुरू झाली. त्यानंतर अथक शोधांअंतीं भारतात आणखी तीन-चार ठिकाणी त्याच्या खाणी चालतात असे वाचले. मी १९५९ ते १९६२ या काळात AEET येथे नोकरी केली. तेव्हां माझ्या एका तरुण सहकार्याने जादुगुडा येथील खाणीसाठी सुरवातीचे सर्व्हेचे काम केले होते असे आठवते. आता भारत या बाबतीत स्वयंपूर्ण आहे.
नैसर्गिकपणे मिळणार्या युरेनिअमच्या मातीत फक्त अर्धा-पाउण टक्का युरेनिअम २३५ व उरलेले युरेनिअम २३८ असते. हे युरेनिअमचे दोन प्रकार, Isotopes,  आहेत. यांत फरक काय? दोन्हीच्या अणूंच्या वजनात किंचित फरक असतो. दोन्हीमध्ये protons ९२च असतात पण neutrons १४३ आणि १४६ असतात. युरेनिअम २३८ हा stable असतो तर U235  हा आपोआप फुटत असतो! मात्र फार सावकाश. त्याच्या विघटनातून ऊर्जा बाहेर पडत असते. मात्र त्याच्या अणूवर एखादा न्यूट्रॉन आदळला तर तो फुटतो व त्यातून दोन वेगळेच अणु (त्यापैकी एक बेरिअम), २ ते ३ सुटे वेगवान न्यूट्रॉन आणि बरीच ऊर्जा बाहेर पडते. हे सुटे न्यूट्रॉन पुन्हा दुसर्या U235 अणूंवर आदळून ही क्रिया चालू राहते व उर्जा भराभर वाढत जाते. यालाच chain reaction म्हणतात. ही बाहेर पडणारी ऊर्जा हीच अणुऊर्जा. (हे अतिशय प्राथमिक दर्जाचे वर्णन आहे. मला वाचून एवढेच कळले आहे!). हिचा बरावाईट उपयोग करण्यासाठी नैसर्गिक युरेनिअम मधील U235 चे प्रमाण वाढवावे लागते. याला enrichment म्हणतात.