युरेनियम आणि प्लुटोनिअम
या कामाची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट व खर्चिकहि आहे. हे प्रमाण जास्तीत जास्त ३-४ टक्क्यांपर्यंत वाढवून त्याचा उपयोग research किंवा power reactors मध्ये करतां येतो म्हणून त्याला Reactor Grade असे म्हणतात. मात्र नैसर्गिक युरेनिअमचाहि reactors मध्ये उपयोग करतां येतो. किमान २० टक्क्यांपर्यंत हे प्रमाण वाढले तर त्यापासून कमीजास्त विध्वंसक शस्त्रे बनतात. म्हणून याला weapons usable grade म्हणतात. मात्र प्रत्यक्ष अणुबॉंब बनवण्यासाठी U235 चे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत वाढवावे लागते. अमेरिकेने हिरोशिमावर असा बॉंब टाकल्यानंतर इतर राष्ट्रांनी त्याऐवजी सुरवातीपासूनच प्लुटोनिअमचा वापर करणे पसंत केले. चीनने मात्र पहिला अणुबॉंब युरेनियमचाच बनवला होता असे वाचले.
आता प्लुटोनिअम म्हणजे काय हे पण थोडे पाहूं. U238 मध्ये ९२ प्रोटॉन व १४६ न्यूट्रॉन असतात व हा निसर्गात मिळतो (त्याचे बरोबरच पाऊण टक्का U235 असतो) U238. हा radio-active नाही व स्वत:हून फुटत नाही. मात्र U235 चे विघटन होताना जे सुटे न्यूट्रॉन निघतात त्यातला एक U238 च्या अणूमध्ये घुसला तर एक नवीन अणु बनतो त्याला U239 म्हणतात किंवा 239pu म्हणजेच प्लुटोनिअम म्हणतात. दोन न्यूट्रॉन पकडून 240pu असा याचा आणखी एक isotope बनतो. 239pu हाहि U235 प्रमाणेच विघटनक्षम असतो व त्याचा उपयोग reactors मध्ये आणि बॉंब बनवण्यातहि होते. नागासाकीवर टाकलेला बॉंब यापासून बनवलेला होता.