Get it on Google Play
Download on the App Store

लवकुशाचा पाळणा

मी हिंडविते गाउनिया लडिवाळा । पाळणा लवकुश बाळा ।

मी वासंती आळविते अंगाई । छकुल्यांनो तुमची आई ।

लुकलुकती चिमणॆ डोळॆ । जिभली ही चुट चुट बोले ।

वर उचलाया बाळ भुवयांची जोडी । लवितसे लाडीगोडी ॥१॥

किती दिवस अशी चाटणार ही बोटे । व्हा गडे लवकर मोठे

मग जाऊ या आपण सारी मिळुनी । बघण्यास अयोध्या भुवनी ।

अळी मळी गुपचिळी बरं का । सांगाल कुणाल जर का ।

कुस्करीन गाल हे बरं का । अन् इवलाले ओठ असे झाकुनी ।

ठेवीन मुके घेऊनी ॥२॥

पाळणे

स्तोत्रे
Chapters
गणपतीचा पाळणा - जो जो जो जो रे गजवदना । म... गणपतीचा पाळणा - जो जो जो जो रे गजवदना । प... विष्णूचा पाळणा शिवाचा पाळणा परशुरामाचा पाळणा रामाचा पाळणा - बाळा जो जो रे कुळभूषणा । ... रामाचा पाळणा - जो जो जो जो रे रघुराया । ... लवकुशाचा पाळणा कृष्णाचा पाळणा - बाळा जो जो रे कुळभूषणा । ... कृष्णाचा पाळणा - मथुरेमध्ये अवतार धरिला । ... दत्ताचा पाळणा - जो जो जो जो रे सुकुमारा ।... दत्ताचा पाळणा - जो जो जो रे जो जो जो । तू... मदालसाचे अंगाई गीत शिवाजीचा पाळणा - तुज जोजविते माय जिजाई बाळ... शिवाजीचा पाळणा - मी लोटिते झोका तुज शिवबाळ... रजनीमाईचा पाळणा शाहूचा पाळणा पांडुरंगाचा पाळणा बाळाचा पाळणा बाळाराजाचा पाळणा वनदेवीचा पाळणा आजीबाईचा जुना पाळणा निर्गुणाचा पाळणा बागुलबावा आला अक्रूराचा पाळणा जोग्याचा पाळणा पाळणा - जो जो जो जो रे गजवदना । म... पाळणा - जो जो जो जो रे गजवदना ॥ प... पाळणा - जो जो जो :जो रे कुळभुषणा ... पाळणा - जो जो जो जो रे रघुराया । ... पाळणा - जो जो रे जो जो श्रीरामचंद... पाळणा - जो जो जो जो रे जो जो जो ।... पाळणा - जो जो जो जो रे सुकुमारा ।... पाळणा - जो जो जो जो रे सुखधामा । ... पाळणा - जो जो जो जो रे व्यापका । ... पाळणा - जो जो जो जो रे त्रिनयना ।... पाळणा - जो जो जो जो रे घनश्यामा ।... पाळणा - बाळा जो जो रे कुळभूषणा । ... पाळणा - मथुरेमध्यें अवतार धरिला ॥... पाळणा - जो जो रे जो जो श्रीकृष्ण ... पाळणा - जो जो जो बाळा नको रडूं गो... पाळणा पाळणा - जो जो जो जा रे मधुसुदना ।... पाळणा - सुतार निर्गुणिचे तुजसाठीं... पाळणा - धरतीच्या बाळा जो जो रे ... पाळणा - हळु हालवितें पाळण्याला ... पाळणा - गुणी बाळ असा जागसि कां रे... पाळणा - जो जो जो जो रे । शिवराया ... पाळणा - सन अठराशें सत्याण्णव साला...