Get it on Google Play
Download on the App Store

मदालसाचे अंगाई गीत

श्रीगुरु देवराया प्रणिपातु जो माझा । अनादि मूळ तूचि विश्‍वव्यापका बीजा ।

समाधि घेई पुत्रा स्वानंदाचिया भाजा । पालखी पहुडलिया नाशिवंत रे माया ॥१॥

जाग रे पुत्रराया जाई श्रीगुरुशरण । देह तू व्यापलासी चुकवी जन्ममरण ।

गर्भवासु वोखटा रे तेथे दु:ख दारुण । सावध होई का रे गुरुपुत्र तू सुजाण ॥२॥

मदालसा म्हणे पुत्रा ऎक बोलणे माझे । चौर्‍यांशी घरामाजी मन व्याकुळ तुझे ।

बहुत सिणतोसी पाहता विषयासी वांझे । जाण हे स्वप्नरुप येथे नाही बा दुजे ॥३॥

सांडी रे सांडी बाळा सांडी संसार छदु । माशिया मोहळं रे रचियेला रे कंदु ।

झाडुनि आणिखी नेला तया फुकटचि वेधु । तैसी परी होईल तुज उपदेशे आनु ॥४॥

सत्व हे रज तम तुज लाविती चाळा । काम क्रोध मद मत्सर तुज गोविती खेळा ।

यासवे झणे जासी सुकुमारा रे बाळा । अपभ्रंशी घालतील मुकशील सर्वस्वाला ॥५॥

कोसलियाने घर सुदृढ पै केले । निर्गमु न विचारिता तेणे सुख मानियेले ।

झाले रे तुज तैसे यातायाती भोगविले । मोक्षद्वार चुकलासी दृढ कर्म जोडले ॥६॥

सर्पे पै दर्दुर धरियेला रे मुखी । तेणेहि रे माशी धरियेली पक्षी ।

तैसा नव्हे ज्ञानयोगु आप‍आपणाते भक्षी । इंद्रिया घाली पाणी संसारी होई रे सुखी ॥७॥

पक्षिया पक्षिणी रे निरंजनी ये वनी । पिलिया कारणे रे गेली चराया दोन्ही ।

मोहोजाळे गुंतली रे प्राण दिधले टाकुनी । संसार दुर्घट हा विचारु पाहे परतुनी ॥८॥

जाणत्या उपदेशु नेणता भ्रांती पडिला । तैसा नव्हे ज्ञानप्रकाशु ज्ञानदेवो अनुवादला ।

अनुभवी गुरुपुत्र तोचि स्वये बुझाया । ऎक त्या उद्धरणा गायक सहज उद्धारला ॥९॥

पाळणे

स्तोत्रे
Chapters
गणपतीचा पाळणा - जो जो जो जो रे गजवदना । म... गणपतीचा पाळणा - जो जो जो जो रे गजवदना । प... विष्णूचा पाळणा शिवाचा पाळणा परशुरामाचा पाळणा रामाचा पाळणा - बाळा जो जो रे कुळभूषणा । ... रामाचा पाळणा - जो जो जो जो रे रघुराया । ... लवकुशाचा पाळणा कृष्णाचा पाळणा - बाळा जो जो रे कुळभूषणा । ... कृष्णाचा पाळणा - मथुरेमध्ये अवतार धरिला । ... दत्ताचा पाळणा - जो जो जो जो रे सुकुमारा ।... दत्ताचा पाळणा - जो जो जो रे जो जो जो । तू... मदालसाचे अंगाई गीत शिवाजीचा पाळणा - तुज जोजविते माय जिजाई बाळ... शिवाजीचा पाळणा - मी लोटिते झोका तुज शिवबाळ... रजनीमाईचा पाळणा शाहूचा पाळणा पांडुरंगाचा पाळणा बाळाचा पाळणा बाळाराजाचा पाळणा वनदेवीचा पाळणा आजीबाईचा जुना पाळणा निर्गुणाचा पाळणा बागुलबावा आला अक्रूराचा पाळणा जोग्याचा पाळणा पाळणा - जो जो जो जो रे गजवदना । म... पाळणा - जो जो जो जो रे गजवदना ॥ प... पाळणा - जो जो जो :जो रे कुळभुषणा ... पाळणा - जो जो जो जो रे रघुराया । ... पाळणा - जो जो रे जो जो श्रीरामचंद... पाळणा - जो जो जो जो रे जो जो जो ।... पाळणा - जो जो जो जो रे सुकुमारा ।... पाळणा - जो जो जो जो रे सुखधामा । ... पाळणा - जो जो जो जो रे व्यापका । ... पाळणा - जो जो जो जो रे त्रिनयना ।... पाळणा - जो जो जो जो रे घनश्यामा ।... पाळणा - बाळा जो जो रे कुळभूषणा । ... पाळणा - मथुरेमध्यें अवतार धरिला ॥... पाळणा - जो जो रे जो जो श्रीकृष्ण ... पाळणा - जो जो जो बाळा नको रडूं गो... पाळणा पाळणा - जो जो जो जा रे मधुसुदना ।... पाळणा - सुतार निर्गुणिचे तुजसाठीं... पाळणा - धरतीच्या बाळा जो जो रे ... पाळणा - हळु हालवितें पाळण्याला ... पाळणा - गुणी बाळ असा जागसि कां रे... पाळणा - जो जो जो जो रे । शिवराया ... पाळणा - सन अठराशें सत्याण्णव साला...