मानध पदव्या
एल.एल.डी.
कोलंबिया विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली एल.एल.डी. (डॉक्टर ऑफ लॉज्) ही मानध.
५ जून १९५२ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठाची मानध एल.एल.डी. ही डॉक्टरेट पदवी स्वीकारल्यानंतर त्यांच्यासोबत वॅलन्स स्टीव्हन्स.
५ जून १९५२ रोजी बाबासाहेब आंबेडकरांना संविधान निर्मिती, सामाजिक कार्याबद्दल आणि मानवी हक्कांचा पहारेकरी या भूमिकेबद्दल कोलंबिया विद्यापीठाने 'एलएलडी' (डॉक्टर ऑफ लिटरेचर) ही सन्माननीय डॉक्टरेट पदवी बहाल केली. 'भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मंत्रिमंडळाचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य, भारतीय नागरिकांपैकी एक प्रमुख नागरिक, एक महान सुधारक आणि मानवी हक्काचा आधारस्तंभ असणारा एक पराक्रमी पुरुष' असं कोलंबिया विद्यापीठाने त्यांना दिलेल्या मानपत्रात संबोधण्यात आले आहे.
डी.लिट.
१२ जानेवारी १९५३ रोजी, हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेली डी.लिट्. ही मानद पदवी
हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाने १२ जानेवारी १९५३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेली डी.लिट्. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) ही मानद पदवी प्रदान केली.
बोधिसत्व
भारतीय बौद्ध विशेषतः नवयानी अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'महान बोधिसत्व' व मैत्रेय म्हणतात. इ.स. १९५५ मध्ये, काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत सहभागी बौद्ध भिक्खूंनी त्यांना 'बोधिसत्व' ही उपाधी प्रदान केली. त्यानंतर दलाई लामा एकदा डॉ. आंबेडकरांना भेटले असता लामांनी सुद्धा त्यांना 'बोधिसत्व' संबोधले होते. बाबासाहेब हे बोधीसत्व होते परंतु त्यांनी कधीही स्वतःला बोधीसत्व म्हटले नाही.
भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारताचे राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांचे हस्ते स्वीकारताना डॉ. सविता तथा माईसाहेब आंबेडकर. १४ एप्रिल १९९० हा त्यांचा शताब्धी जयंती दिन होता. हा पुरस्कार सोहळा राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल/अशोक हॉलमध्ये संपन्न झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य, मजूर व स्त्रियांच्या उद्धारासाठी केलेले कार्य, स्वतंत्र भारताची राज्यघटना निर्मितीचे केलेले राष्ट्रीय कार्य तसेच आयुष्यभर समता स्थापनेसाठी केलेला प्रखर संघर्ष यासाठी 'भारतरत्न' हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार (मरणोत्तर) देण्याचे भारत सरकारने एप्रिल १९९०च्या पहिल्या आठवड्यात जाहिर केले. आणि १४ एप्रिल १९९० रोजी त्यांना मरणोत्तर भारतरत्न या पुरस्काराने गौरवले गेले. डॉ. आंबेडकरांना दिलेला 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारताचे राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांचे हस्ते डॉ. सविता तथा माईसाहेब आंबेडकर यांनी स्वीकारला. १४ एप्रिल १९९० हा त्यांचा शताब्धी जयंती दिन होता. हा पुरस्कार सोहळा राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल/अशोक हॉलमध्ये संपन्न झाला होता.