Get it on Google Play
Download on the App Store

एक कप चहा – स्वाती पाटील

एक कप चहा – स्वाती पाटील

साडेपाचचा गजर झाला. मालतीला तसा गजर स्नुझ करून पुन्हापुन्हा झोपायची सवय, पण सुहास नसल्यामुळे ती एका गजर मध्येच उठायची आणि उठायचंच म्हणून मोबाईलही स्वतःपासून लांब ठेवायची..

डोळ्यावरची झोप बाजूला सारून तिने खिडकीतून बाहेर पाहिलं, बाहेर अंधारच होता, नुकतीच पक्षांची किलबिल ऐकू येत होती. तसं मालतीला खिडकीतून काही विशेष दिसायचंच नाही, नाही म्हणायला एक बदामाचं झाड होतं. त्या झाडाकडे ती पाहत राहायची.. मालतीला तशा मोठ्ठयां गॅलऱ्या आणि उंचावरचे मजले फार आवडायचे... उंचावरून सगळं जग वेगळंच दिसतं आणि त्रयस्थ म्हणून समोरच्याची प्रत्येक हालचाल टिपता येते...

माहेरी असताना तास्सनतास गॅलरीत चहाचा कप घेऊन ती माणसं टिपत राहायची. चालता चालता कुणी जरा धडपडलं तरी तिला गम्मत वाटे...

लग्नानंतर मात्र ग्राउंडफ्लोरच्या बेडरूम मधून दिसणारं हे बदामाचं एकमेव झाड...गजर झाल्याबरोबर ती उठली. चुरचुरलेल्या डोळ्यांनी बदामाचं झाड पाहिलं. श्रेयाचं पांघरूण नीट करून ती किचनकडे गेली. पीठ मळलं. पोळीभाजी झाली तितक्यात पाणी आलं. टाकीत पाईप सोडून ती श्रेयाला उठवायला गेली. सुहास लांब गेल्या पासून तिची फारच दगदग व्हायची. सकाळचं उठणं, स्वयंपाक, डबा, श्रेयाची तयारी, नाही म्हणायला सासूसासऱ्यांची मदत व्हायची पण त्यांचीही आता वये झालेली त्यामुळे अपेक्षा तरी किती करणार?

श्रेयाचं आटपून मालतीने तिला स्कुलबस मध्ये सोडलं बस वळणावरून पुढे जाईपर्यंत मालती स्थितप्रज्ञासारखी हात हलवीत उभी राही. बस वळली की हिची धावाधाव सूरु . ऑफिस भायखळ्याला... स्टेशनसाठी तिने लगेच रिक्षा पकडली.

“आठ वाजून अकरा मिनिटांची छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी जलद लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर येत आहे.”

तसा मालतीचा स्पीड आणखीन वाढला. झपाझप ब्रिज उतरून ती डायरेक्ट ट्रेनमध्येच शिरली. पण आत जायला जागाच नव्हती. बराचवेळ ती दारात फडफडणारं वारं अंगावर घेत उभी राहिली. तिला तो आवाज फार आवडायचा. वाऱ्याचा तो आवाज कानावर पडला की भावनांचा कल्लोळ तेवढ्यापुरता तरी शमायचा. विचार करायच्या फार कमी संधी ती स्वतःला द्यायची. ठाणे गेल्यावर ती कशीबशी आत सरकली.

नेहमीचंच रुटीन नाविन्य काहीच नाही. तसं पाहिलं तर नाविन्याचं रुटीन व्हायला कितीसा वेळ लागतो? एकच गोष्ट आठवडाभर केली की झालं रुटीन.. बस तेवढंच मालती करत होती.

सुहास नसल्यानं म्हणा किंवा आणखी कशाने म्हणा मालतीने रुटीनच्या बाहेर जाणंच सोडल होतं. आहे ते तिला ठीक वाटायच आणि रुटीनच्या बाहेर जाऊन आता करायचे तरी काय ? हा प्रश्न होताच.

केबिनमध्ये येऊन मालती खुर्चिवर रेलली. ऑफीस तिसर्याू मजल्यावर होतं, घरात आणि इथं साम्य म्हणजे तिच्या खुर्चीतून समोरच मोठ्ठ बदामाचं झाड दिसायचं. झाडाकडे पाहत तिने डोळे मिटून घेतले. सकाळचे साडेपाच ते आताचे साडेनऊपर्यंत झालेल्या धावपळीची इतिश्री म्हणजे मस्टरवरची सही, बस्स एवढाच अट्टहास.. सही झाली होती.

नेहमीप्रमाणे सारीकाने कॉफी आणून ठेवली. कप ठेवल्याच्या आवाजाने मालतीने डोळे उघडले

"गुड मॉर्निंग”

"गुड मॉर्निंग मॅडम"

"थॅंक्स सारिका, सर आले का ग ?”

"हो आलेत"

"मुलांच्या शाळा सुरू झाल्या का ?"

"हो परवाच"

"बरं, काही मदत लागली तर सांग."

"हो"

सारिकाला तीन मुले , नवरा दारूडा, तरी "ही" नेटाने संसार करायची. बायकांचा स्थायी भावच तो. मालतीने सुस्कारा सोडला आणि कामाला सुरूवात केली.

आज ऑफीसमधून निघायला उशीरच झाला. जशी आली तसाच तिचा उलट प्रवास सुरू... मालती कुणासाठीच थांबायची नाही. ऑफीस सुटलं की बाणाच्या वेगाने सरळ स्टेशनला घरी जाताजाता श्रेयाच्या प्रश्नाना उत्तरं काय द्यायची ह्याचाच विचार ती करत होती. श्रेयाला पोहण्याचा क्लास हवा होता पण मालतीसाठी इतकं सोप्प राहिलं नव्हत सगळ.. तिला नेणार कोण? आणणार कोण? मालती मग उगाच तिला टाळत राही.

"पंधराचा पाढा पाठ झाला की लावीन हं तुला क्लास."

"नक्की ना आई"

"हो, बाळा नक्की"

आठवड्याचा तरी प्रश्न मिटला होता. माणसाला तात्पुरता पर्याय किती सोयीचा वाटतो. तिचं तिलाच हसू आलं.

---------------------------------

आज मालतीने स्लो ट्रेन पकडली. नेहमीप्रमाणे खिडकीची जागा तिने पटकावली. प्रवासात खिडकी मिळणे म्हणजे शापही आणि वरदानही. जुन्या आठवणी नुसत्या डचमळत राहतात त्या ट्रेनबरोबर आणि मग त्या ट्रेनच्या खिडकीतून मनाच्या पृष्ठ भागावर काय काय येईल याचा नेम नाही.

खिडकी,कानात हेडफोन आणि कल्याणच्या दिशेने जाणारी ट्रेन, पण मालतीचा प्रवास मात्र सुहास सोबत कधीच सुरू झाला होता.

"मालु, चल या रस्त्याने जाऊया का ? "

"अरे , तू म्हणशील त्या रस्त्याने जाऊ", मालती खळाळून हसली.

"हा रस्ता बघ, अगदी सिनेमातल्या सारखा आहे ना? ही बघ दुतर्फा झाडं आणि मधोमध हा मोठा रस्ता.”

"मस्त ना?"

"हो मस्तच आहे""

"चहा घेऊया का वाटेत? "

"हो, म्हणजे काय?"

"येस्स"

लयबद्ध गाडी चालवत सुहास मालतीच्या गप्पा रंगल्या ह#285327344

मराठी फॉर्वर्डस 2

Contributor
Chapters
शास्त्रज्ञ BARC शास्त्रज्ञ BARC - 2 आत्मविश्वास एक कप चहा – स्वाती पाटील एक कप चहा – स्वाती पाटील - 2 #285327346 #285327347 मंदोदरी .एक शापित देवता -1 मंदोदरी - 2 घुसखोरी घूसखोरी -2 #285327352 माझं डोकं दुखत होतं. *''दिवस तुझे हे फुलायचे! झोपाळ्या वाचून झुलायचे"!!* या गाण्याचे विडंबन. बघा बरं पटतय का? _*ऑटोभास्कर!*_ _*ऑटोभास्कर!*_ 2 _*ऑटोभास्कर!*_ 3 *सामाजिक कविता* #285327324 #285327326 #285327327 #285327328 #285327329 #285327330 #285327331 #285327332 *राजा . . गोसावी*! #285327335 #285327336 #285327340 इव्हान व्हॅसिली इव्हान व्हॅसिली -2 महापुरुष अल्का 1 अलका प्रेम #285327360 #285327362 #285327363 #285327364 शिक्षकांचा पगार... #285327369 #285327370 #285327371 #285327372 ?? *जिवलगा* ?‍? - 1 ?? *जिवलगा* ?‍? - 2 #285327385 #285327386 #285327387 #285327388 #285327389 #285327390 #285327391 #285327392 #285327394 #285327395 #285327409 जगू या, जिंकू या #285327411 #285327412 #285327414 #285327415 #285327417 #285327418 #285327419 #285327421 #285327422 #285327424 #285327429 #285327430 #285327433 #285327434 #285327435