Get it on Google Play
Download on the App Store

#285327347

लो? तीच तिलाच हसू आलं, सुहासतरी कुठं पूर्ण गेलाय? अंतर्मनात ठाण मांडून बसलाय..

तुला त्रास होतोय का मालती त्याचा… नाही.... त्रास कसा होईल? आयुष्यातल प्रत्येक सुखं त्याने आपल्याला दिलं. केंद्रस्थानी होता तो..आता नाही जगाला तो दिसत नाही आणि माझ्या समोरून हलत नाही.. ना सुहास, ना ती घोरपड,ना ते कबुतर, ना तो दिवस.

दार उघडचं होतं..टीव्ही इथेही काहीबाही बडबडत होता..मालती तशीच ओलेती बेडरूममध्ये गेली. कुणी काही विचारलं नाही. श्रेया झोपली होती..

असाच पाऊस पडत होता सुहासने विचारलं,”या रस्त्याने जाऊ?”,. का हो म्हटलो आपण?

मी विचारलं, “चहा घेऊया?”

का हो म्हणाला तो?

का दिसली ती घोरपड मला?

तिथली पाचमिनिटं वाचली असतीतर कदाचित पुढची वेळ टळली असती… छे…नियती सगळं पाहत होती..अर्ध्यावाटेवर तिने ते पिल्लू मारलं..आणि आपली वाट पूर्ण होतांना सुहास… कसा लपवशील मालती तो दिवस? कुणा पासून? तुला स्वतःला तर सगळं माहितेय "

सुहासने घोरपडीचं पिल्लू गवतात टाकलं तू गप्पच होतीस तेच वाक्य..“अगं मालू घडतात असे प्रसंग......”

“चल... चहा घेऊ म्हणजे तुला बरंवाटेल”

“हं”

“मस्त गप्पा पण होतील”

“नाही..अरे..घरी लवकर जाऊया,श्रेया वाट पाहत असेल”

“ठिके गाडीतच घेऊ”

हीच ती वेळ..नियती हसली..सगळं तिने टाकलेल्या फाश्यांप्रमाणे घडत होतं.. माझ्या दोन्ही हातात वाफाळत्या चहाचे दोन कप... मी एक एक घोट सुहासला देत होते.गप्पा रंगल्या होत्या..पाऊस रिपरिपत होता…गाडी बेफांम स्पीडला होती आणि अचानक तो प्लास्टिकचा कप माझ्या हातून निसटला..नियती काळवंडून हसली..गाडी दुभाजकावर नेमकी सुहासच्याच बाजूने आदळली..क्षणार्धात सुहास रक्ताच्या थारोळ्यात. माझा आरडाओरडा, सिनेमासारखा रस्ता भयाण झाला…बाजूनं सप्पासप गाड्या जात होत्या. कुणी थांबायला तयार नाही..

“ए सुहास, ऐकना मी करते काहीतरी सुहास……”

सुहासचे ते करूण डोळे, आख्ख आयुष्य त्या डोळ्यात एकवटल होतं….

“मालू, वाचवं मला , पुन्हा नव्याने जगायचंय मला”

मला वाचव…..

जसं ते पिल्लू सुहासला सांगत होतं….ते कबुतर मलासांगत होतं………धपापलेला उर…….. निसटता श्वास…….....पंखांची फडफड……मंदावत जाणारे ठोके………रस्त्यावरची घट्ट पकड…….शेवटच्या क्षणी घोरपडीला दिलं तेच पाणी सुहासच्या मुखी… जीव जाणं सारखच… निष्प्रभ………. मलूल पडत जाणारे ते डोळे……….हरवत जाणारं चैतन्य…………अधूनमधून आईचे डोळे सुद्धा त्या घोरपडीच्या डोळ्या सारखे करूण का होतात?

मालती थरथरत उठते. भिंतीवर न लावलेला सुहासचा फोटो ड्रॉवर मधून काढते,पाऊस अजून ही रिपरिपतच असतो….हताशपणे डोळे मिटले जातात…………बाजून जाणाऱ्या गाड्या आता संथ झालेल्या असतात…

पाऊस थांबलेला असतो….कुणीतरी रुग्णवाहिकाe बोलावतं.. सुहासला वेळेत हॉस्पिटलला पोहचवलं जातं..मालती त्याच्या उशाशी बसून…

आणि……..

तो हळूच तिला म्हणतो, “माले,चहा घेऊया का गं ?”

--------------------------------------

सकाळी साडेपाचचा गजर..बाहेरच बदामाचं झाड पावसात न्हाऊन निघालेलं…मालती डोळे उघडते…

सुहास फोटोतून हसतो…. तिच्या पुरता का होईना….काल रात्री सुहासचा जीव वाचलेला असतो….

--------------------------------------

स्वाती पाटील#285327347

भारताचा शोध

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
शास्त्रज्ञ BARC शास्त्रज्ञ BARC - 2 आत्मविश्वास एक कप चहा – स्वाती पाटील एक कप चहा – स्वाती पाटील - 2 #285327346 #285327347 मंदोदरी .एक शापित देवता -1 मंदोदरी - 2 घुसखोरी घूसखोरी -2 #285327352 माझं डोकं दुखत होतं. *''दिवस तुझे हे फुलायचे! झोपाळ्या वाचून झुलायचे"!!* या गाण्याचे विडंबन. बघा बरं पटतय का? _*ऑटोभास्कर!*_ _*ऑटोभास्कर!*_ 2 _*ऑटोभास्कर!*_ 3 *सामाजिक कविता* #285327324 #285327326 #285327327 #285327328 #285327329 #285327330 #285327331 #285327332 *राजा . . गोसावी*! #285327335 #285327336 #285327340 इव्हान व्हॅसिली इव्हान व्हॅसिली -2 महापुरुष अल्का 1 अलका प्रेम #285327360 #285327362 #285327363 #285327364 शिक्षकांचा पगार... #285327369 #285327370 #285327371 #285327372 ?? *जिवलगा* ?‍? - 1 ?? *जिवलगा* ?‍? - 2 #285327385 #285327386 #285327387 #285327388 #285327389 #285327390 #285327391 #285327392 #285327394 #285327395 #285327409 जगू या, जिंकू या #285327411 #285327412 #285327414 #285327415 #285327417 #285327418 #285327419 #285327421 #285327422 #285327424 #285327429 #285327430 #285327433 #285327434 #285327435