?? *जिवलगा* ?? - 1
नेहमीसारखीच प्रॅक्टिकल संपवून ती आपल्या लॅबमध्ये निवांत बसली होती.. test series साठी प्रश्न निवडत होती.. तिच्या समोरच्या टेबलवर पुस्तकं विखुरलेली होती...आपल्या कामात ती अगदी गुंगून गेली होती... ती लॅब म्हणजे तिची जागा होती.. खूप आवडायची तिला ती... लॅबच्या एका कोपऱ्यात तिने लावलेली छोटीशी बाग होती.. fish pond होता... एकदम शांत, स्वच्छ जागा... तिची कर्मभूमी... तिला तिथे अगदी मंदिरात बसल्यासारखे वाटायचं... बाकीच्या department मधले प्रोफेसर्स मात्र तिथे यायला घाबरायचे... कारण त्या लॅब मध्ये एका मनुष्याचा सांगाडा होता... ती वेडी त्याच्याशीही बोलत बसायची..."कोण बाबा तू?कुठला कोण देव जाणे पण तुझं जाणं मुलांना शिकवून जातंय... तुझा आत्मा आहे की नाही माहीत नाही पण तू स्वतः पुण्यात्मा आहेस इतकं मात्र नक्की हं".... लॅब मध्ये आल्या आल्या ती त्याला 'काय रे कसा आहेस?'म्हणून विचारायची....
त्यादिवशीही तिने काम करता करता त्याची चौकशी केली... आणि इतक्यात कोणीतरी मी आत येऊ का?असे विचारले... तिने मान वर करून दरवाज्याकडे पाहिले... काचेतून तो आत यायची परवानगी मागत होता... तिने दरवाजा उघडला...
दरवाजा उघडता क्षणीच तो मस्त हसला... अगदी गोड... गंमत म्हणजे त्याचे केस चक्क तिच्यासारखेच होते, कुरळे आणि तिच्या केसांपेक्षाही लांब... उंचीला बुटकासा असा तो छान प्रसन्न हसत आत आला...तिच्या लक्षात आले की त्याला खूप मस्त खळी पडतेय...
तुमच्याशी काही बोलायचंय... तो म्हणाला... अरे मी buzy आहे रे आता.. 20-25 मिनिटे तरी लागतील मला....
'No problem... मी थांबतो' तो हसत हसत उत्तरला.. ती कामात व्यग्र झाली... तो त्या लॅबमध्ये सगळीकडे फिरत होता... fishpond मधल्या माशांशी बोलत होता... तिच्या त्या 'mr सांगाडा' दोस्ताशी बोलत होता...
ती काम करता करता त्याचे निरीक्षण करत होती.. एकदाचं काम आटोपून ती निवांत झाली...'हं बोल रे....काय काम होतं',तिने विचारलं.... 'विसरलो आता'..कमाल आहे ह्याची!! काय रे आज lectures नाही आहेत तुला...इतका मोकाट फिरतो आहेस ते!! तिने हैराण होऊन विचारले त्याला...
'आहेत की... पण खूप कंटाळा येतो...' तो तिच्यासमोर येऊन बसला... त्याचं हसू खरंच खूप प्रसन्न होतं अगदी निर्मळ...'मला computer science आवडत नाही'...मला music आवडतं, फिरायला आवडतं, समुद्र आवडतो... तो बडबड करत होता अखंड... अगदी तिच्यासारखाच...
'अरे पण तू नक्की कशाला आला होतास?' तिने हैराण होऊन विचारलं..
विसरलो ना मी आता... जातो मी...उद्या येतो....
वाऱ्यासारखा आला आणि वाऱ्यासारखा गेला.... खरं तर ती त्याला एकही विषय शिकवत नव्हती पण तो मात्र तिच्याकडे जणू काही सगळे विषय तीच शिकवतेय अशा थाटात येऊन बसायचा...
तिचा छोटा दोस्त... तिचा लाडका... रोज संध्याकाळचं शेवटचं lecture तिचं असायचं..६वाजता सुटायचं ते lecture.. अंधेरी स्टेशनला ६.२०ला असणारी फ्लाईंग राणी एक्सप्रेस ही ट्रेन तिला पकडावी लागायची.. म्हणजे ती ८पर्यंत घरी पोहोचू शकायची पण जर ती ट्रेन चुकली तर मात्र तडक रात्री ८वाजता लोकशक्ती एक्सप्रेस असायची...आणि मग ती घरी 10 वाजता पोचायची...जुहू ते अंधेरी स्टेशन हे अंतर तिला प्रचंड वाटायचं.. एकेक मिनिट ती मोजत असायची... शेवटचे lecture झालं की तशीच वर्गातून पळत सुटायची ट्रेन पकडण्यासाठी... बऱ्याच वेळा तिची ती ट्रेन सुटायची... हतबल व्ह्यायची ती..
एक दिवस अशीच पळत असताना.. एक रिक्षा थांबली... 'बसा पटकन...' तोच होता.. तिचा छोटा दोस्त..
'अरे तू तर सांताक्रूझ ला राहतोस ना...?' 'हो' पण आज अंधेरी स्टेशन वरून जाईन... रिक्षात तो बडबड करत होता... त्याच्या स्वप्नाविषयी बोलत होता...
'ए बाबा मला संगीतातले काही कळत नाही हं... पण गाणं आवडतं मला ऐकायला...'
'मी ऐकवू का तुम्हांला माझं गाणं' त्याने लगेचच पडत्या फळाची आज्ञा घेतली...
त्याला हो नाही असे काहीही उत्तर न देता ती पळत सुटली तिची ट्रेन पकडायला...आणि त्यानंतर तो जवळपास रोज थांबू लागला तिच्यासाठी... तिची ट्रेन चुकू नये म्हणून...
तो वरचेवर तिच्याशी गप्पा मारत होता.. त्याच्या नवीन रचना तिला ऐकवत होता.. संगीताचा विषय निघाला की त्याचे डोळे वेगळेच चमकायचे...त्यांचे ऋणानुबंध अजून मजबूत होत चालले होते...
तो तिला सगळं सांगायचा.. त्याच्या आईवडिलांची भांडणं... पैशाचा खेळ, घरातील बिघडलेलं वातावरण...त्याचं बोलणं ऐकून ती तीळ तीळ तुटायची... तो बोलत असताना एक अपार वात्सल्य दाटून यायचं तिच्यात...
'तुम्हांला एक सांगू... ?' त्याने विचारलं... 'अरे बोल की बिनधास्त..त्यात काय?' माझा हा जन्म तर गेला ...पुढचा जन्म तुमच्या पोटी घ्यायचा आहे मला.….
अरे!!हे लेकरू काय बोलून गेलं.....'अरे बाळा.. आताही तू लेकच तर आहेस की रे माझा.. इतकं जीव कोणी लावतं का रे कधी?...'ती उत्तरली..
त्याने पटकन तिचे हात पकडले आणि आर्त हाक मारली.... 'माझी आई आहेस
#285327373