Get it on Google Play
Download on the App Store

प्रेम

प्रेम हे कधी रूप, रंग आणि कोणतीही कमी बघत नाही. प्रेम खरं तर मनावर होतं. प्रेम ठरवून करता येत नसलं तरी एखाद्या सोबत ठरवून आयुष्य जगता येतं.
प्रसन्नाला कविता लिहण्याचा खूप छंद होता. ती तिच्या कविता सोशल मिडीयावर पोस्ट करायची. तिच्या कवितांना खूप Likes मिळायचे. तिच्या कविता होत्याच खूप भावनिक की कोणीही त्या कवितेत भावून जाईल. तिच्याच एका सोशल मिडीयावरील सागर नावाच्या मुलाला तिच्या कविता खूप आवडायच्या. जेव्हा जेव्हा ती तिच्या कविता पोस्ट करायची. तेव्हा तेव्हा तो ती कविता त्याच्या एका बुक मध्ये लिहून ठेवायचा.
तिच्या या कवितांमुळे ती त्याला खूप आवडायला लागली. त्याने तिला कधीच पाहीले नव्हते. तो नेहमी तिच्या कवितांवरून तिचे रूप मनात रंगवायचा. एवढी सुदंर कविता लिह्णारी किती सुंदर असेल असे तो विचार करायचा. तो तिच्या प्रत्येक कवितांच्या पोस्ट वर कमेंट करायचा. एक दिवस त्याने तिला मॅसेज करायचे ठरवले. त्याने हिम्मत धरून तिला सोशल मिडीयावर Hi हा मॅसेज केला. प्रसन्ना ने त्याचा मॅसेज पाहिला आणि तिने सुद्धा रिप्लाय दिला. मग त्याने तिला सांगितले की, आपण अतिशय अप्रतिम कविता पोस्ट करता. एक विचारायचे होते, ह्या कविता तुम्ही स्वतः बनवता का?” तिचा रिप्लाय हो आला. नंतर तो म्हणाला की, खरचं तुम्ही खूप भावनिक कविता लिहता आणि मला तुमच्या कविता खूप आवडतात. तिने धन्यवाद रिप्लाय दिला आणि ती ऑफलाईन गेली. अशाप्रकारे तो नेहमी तिला मॅसेज करायचा. दोघे ही एकमेकांशी खूप बोलायचे.
सागर गॅलेरीत बसून त्याच्या बुक मध्ये लिहलेल्या तिच्या कविता वाचत होता. तिने अजून कविता पोस्ट केल्या आहेत का हे पाह्ण्यासाठी तो सोशल मिडीयावर ऑनलाईन आला. त्याला दिसले की प्रसन्ना पण ऑनलाईन आहे. तर त्याने तिला मॅसेज केला "काय करतेय? "तिने रिप्लाय केला" काही नाही आणि तू" त्याने विचार केला की आपण इतके दिवस झाले हिच्या सोबत बोलत आहोत. तर तिचा फोन नंबर मागायला हवा. मग त्याने धाडस करून तिचा फोन नंबर मागितला. तिने देण्यास नकार दिला. पण ती त्याच्यावर रागवली नाही ती म्हणाली की, “आपण येथे मॅसेज वरच बोलू". तेव्हा सागर ओके रिप्लाय करतच होता की चुकून त्याचा फोन हातातून सटकला आणि गॅलेरीतून खाली पडला. जेव्हा तो खाली फोन आणायला गेला तेव्हा त्याचा फोन खूप खराब झाला होता. तो फोन रिपेरिंगसाठी घेऊन गेला तर तेथील दुकानदाराने त्याला, "हा फोन १५ दिवसानंतर रिपेअरिंग करून मिळेल" असे सांगितले.
त्याने होकार दिला आणि घरी आला. प्रसन्ना त्याच्या रिप्लायची वाट पाहत होती. तिला वाटले याला नंबर नाही दिला म्हणून हा रागवला असणार. ती त्याला मॅसेज करत राहिली. पण याचा फोन खराब झाला आहे हे तिला माहित नव्हते आणि सागरला काही कारणासाठी गावाला जावे लागले. दोन दिवस झाले मॅसेजचा रिप्लाय आला नव्हता. तिला खूप वाईट वाटले तिला वाटले की सागर तिच्याशी कधीच बोलणार नाही. म्हणून तिने त्याला मॅसेज करायचे सोडून दिले. १० दिवस झाले होते. तिला करमत नव्हते कारण तिला सवय झाली होती त्याच्याशी बोलायची. तिने त्याला मॅसेज केला आणि तिचा नंबर दिला आणि ती म्हणाली की, "हा घे माझा नंबर, तुला राग आला आहे म्हणून तुला दिला, पण प्लीज माझ्याशी बोलत जा. सवय झाली आहे मला तुझ्याशी बोलायची" तरी त्याचा रिप्लाय येत नाही.
सागर गावावरून येतो आणि फोन रिपेअरिंग झाला का हे पाहण्यासाठी जातो. तर तो दुकानदार त्याला म्हणतो की, फोन कधीच रिपेअरिंग केला होता. त्याने फोन घेतला आणि तिचे मॅसेज पाहिले. त्याला कळले होते की हिचा गैरसमज झाला आहे. त्यामुळे तो तिला मॅसेज न करता कॉल करायचे योग्य समजून तिला कॉल करतो. पण तिने त्याचा फोन असेल म्हणून कट केला आणि फोन वर मॅसेज केला की, "मी घरी असते म्हणून फोन वर नाही बोलू शकत.” तर त्याने ही ठीक आहे हा रिप्लाय दिला.
मग दोघे ही फोनवरच मॅसेज करून एकमेकांशी बोलयचे. त्याने त्यांच्यामधील झालेला गैरसमज दूर ही केला. दोघेही एकमेकांशी मॅसेजवर खूप बोलायचे. त्यामुळे एक ही दिवस त्यांना एकमेकांशी बोलल्याशिवाय जायचा नाही. एक दिवस सागरने तिला भेटायचे असे ठरवले. त्यांच्या बोलण्याबोलण्या मध्ये त्याने तिला विचारले की, "प्रसन्ना आपण इतके दिवस झाले एकमेकांशी बोलत आहोत, मला एकदा तूला भेटायचे आहे. तुझा आवाज ऐकायचा आहे.” तिने या प्रश्नाचे उत्तर दिलेच नाही. खूप वेळ मॅसेज नाही आला. सागरने परत मॅसेज केला की, "सांग ना गं" तिचा रिप्लाय आला की "आपण असंच नाही बोलू शकत का? भेटणे महत्वाचे आहे का?” तो म्हणाला, “असे नाही आहे, तरी पण एकदा तुला बघायचे आहे. तुझा आवाज ऐकायचा आहे.” तर ती म्हणाली की, "एक Promise करशील? " तो हो म्हणाला. ती म्हणाली की, “मी जेव्हा तुला भेटायला येईल आणि तेथे तुला काही कळाले, तरी तू आपली ही मैत्री तशीच ठेवशील ना?” तो म्हणाला, “अगं वेडी असं का बोलतेय" ती म्हणाली, “आधी तू सांग" मग तो म्हणाला, "हो, मग उद्या भेटूया का?” ती हो म्हणाली. मग त्या दोघा#285327359

मराठी फॉर्वर्डस 2

Contributor
Chapters
शास्त्रज्ञ BARC शास्त्रज्ञ BARC - 2 आत्मविश्वास एक कप चहा – स्वाती पाटील एक कप चहा – स्वाती पाटील - 2 #285327346 #285327347 मंदोदरी .एक शापित देवता -1 मंदोदरी - 2 घुसखोरी घूसखोरी -2 #285327352 माझं डोकं दुखत होतं. *''दिवस तुझे हे फुलायचे! झोपाळ्या वाचून झुलायचे"!!* या गाण्याचे विडंबन. बघा बरं पटतय का? _*ऑटोभास्कर!*_ _*ऑटोभास्कर!*_ 2 _*ऑटोभास्कर!*_ 3 *सामाजिक कविता* #285327324 #285327326 #285327327 #285327328 #285327329 #285327330 #285327331 #285327332 *राजा . . गोसावी*! #285327335 #285327336 #285327340 इव्हान व्हॅसिली इव्हान व्हॅसिली -2 महापुरुष अल्का 1 अलका प्रेम #285327360 #285327362 #285327363 #285327364 शिक्षकांचा पगार... #285327369 #285327370 #285327371 #285327372 ?? *जिवलगा* ?‍? - 1 ?? *जिवलगा* ?‍? - 2 #285327385 #285327386 #285327387 #285327388 #285327389 #285327390 #285327391 #285327392 #285327394 #285327395 #285327409 जगू या, जिंकू या #285327411 #285327412 #285327414 #285327415 #285327417 #285327418 #285327419 #285327421 #285327422 #285327424 #285327429 #285327430 #285327433 #285327434 #285327435