जात...
जातीचं साहेब
काय घेऊन बसला,
स्वार्था साठी माणूस
माणसावर फिरला..
देव बसला बाहेर
माणूस देवळात शिरला,
देवपण येऊन अंगी
माणूस माणसावर कोपला..
फायद्यासाठी दंगली
आपसात होऊ लागल्या,
जाती साठी रक्ताच्या
नद्या एक होऊ लागल्या....
कोण म्हणे देव आता
दवाखान्यात बसला,
जाती-पातीच्या रोगांनं
कोण कुठं झोपला....
जातीचं साहेब
काय घेऊन बसला,
जातीचा वणवा
स्मशानात विझला...
संजय सावळे