बेधुंद...
कमनीय बांधा तुझा
सुरेख नाजूक किती
घायाळ मीही झालो
झाले कित्येक आधी...
अक्षर-अक्षर मला न कळे,
न कळे अक्षर काही..
अडाणी मीच होतो,
ना जुळली तार कधी..
पैंजने कैक वेळा
तार छेडुनी गेली,
नजरेत गजरे
वेणी गुंफून गेली...
मैफलीत रात्र
ज्वाणीतं आली,
ग्लासामाघे ग्लास
बेधुंद होऊन गेली...
संजय सावळे