संघर्ष
भोगत आलो यातना
दारात मरणाच्या,
रानोमाळ फिरलो
शोधात भाकरीच्या.
किती करायचा सारखा
संघर्ष जगण्याचा.
त्यावेळी असायचा
हातात हात तुमच्या,
भीतीही नव्हती
की नव्हती खंत,
सदा झाकलेला असायचो
सावलीत तुमच्या.
सावल्या सोडून गेला
कधीच सूर्य अस्ताला,
काळोखातही दिसतो
एक तारा दिपणारा.
मी शोधतो त्यात
मशाली संघर्षाच्या
मशाली संघर्षाच्या!
संजय सावळे