मूर्ती..
गाभाऱ्यातील मूर्ती
भग्नउदास बसली होती,
आयुष्याचं देणं
येणाऱ्याला माघत होती..
फुलं पडून चरणावरती
मंद वात जळत होती,
दूर नांद घंटेचा
मंजुळ कानं ऐकत होती.
ऐकून रडगाणी जीवनाची
मूर्ती आता भंगली होती
येणाऱ्यालाच आपले
दुःख सारी सांगत होती...
पाहून भयाण काळोख
मूर्ती आता थरथरत होती ,
जळून वात कधीच
समई अंधारात उभी होती...
संजय सावळे