बेवारस
स्मशानात पूर्वी
मुडदा एखादा यायचा,
रडता रडता सारा
गाव गोळा व्हायचा...
हल्ली स्मशानातही
मुडदे रोज येऊ लागले
येण्याआधी कित्येक
बेवारस होऊ लागले
जाती पातीचा आता
भेदभाव नव्हता,
सजलेल्या तिरडीला
मानकरीही नव्हता....
खरंच मरणाचे हाल
कवडीमोल झाले
गर्दीत मुडदे बेवारस
होऊ झाले...
संजय सावळे