अहंकार
छाटले पंख जरी
भिडेन मी नभाशी
फोडून वाचा अन्यायाला
लढेन असत्याशी.....
निरंतर इथे नाही
शाश्वत काही,
धावतो मृग जसा
शोधण्यास जल काही....
मी एकटाच दुःखात
कधी धावलो नाही,
माझ्या माघे रस्त्यावर
माणूस मावला नाही....
ढगांआडून पहा
झाकले आकाश सारे,
अहंकाराच्या पोकळीत येथे
निजलेत मुडदे सारे......
संजय सावळे