माझा बा....
सपणात आलेला बा
झोप उडवुन गेला,
आठवणींच्या गर्दीत
डोळे ओलावून गेला.....
असून सगळं काही
कित्येक मंदिरही पाहत गेलो...
मूर्तीमध्ये माझा बा
रातनदीस शोधत आलो....
शेवटी.....
देवाविना देव्हारा
बरंच काही सांगून गेला...
जेव्हा माझा बा मला
अनाथ करून गेला..
अनाथ करून गेला....
संजय सावळे