Get it on Google Play
Download on the App Store

पॅलेस ऑन व्हील्स

हि गाडी भारतातील सगळ्यात जुनी लक्झरि ट्रेन आहे.ह्याची सुरुवात २६ जानेवारी १९८२ साली झाली.हि ट्रेन राजस्थान पर्यटन आणि विकास मंडळातर्फे चालू करण्यात आली. या ट्रेनला आपले नव तिच्या इतिहासावरून मिळाले आहे. यामध्ये वापरले गेलेले साहित्य राजे राजवाडे आणि ब्रिटीशांच्या वॉईसरॉयने वापरलेले आहे. या ट्रेनच्या कंपार्टमेंटचे नाव राजपुतांनी राज्य केलेल्या शहरांवर ठेवले आहे.  ट्रेन राजस्थानच्या वेगवेगळ्या शहरातून घेऊन जाते. पॅलेस ऑन व्हील्स हि ट्रेन आपल्या चांगल्या  आदरतिथ्यासाठी आणि उच्च दर्जाच्या सुविधांसाठी ओळखली जाते. प्रत्येक सूट हा पर्यटकांसाठी राजमहालाचे प्रतिरूप असल्याप्रमाणे आहे. ट्रेन मध्ये मिळणारे जेवण आपल्याला राजस्थानची अस्सल मेजवानी देते. यामध्ये ऑन बोर्ड डॉक्टर, फ्री इंटरनेट सेवा. टीवी, जिम, इनडोर खेळ हि सगळी वैशिष्ठ्ये आहेत.

याचे एका माणसाचे तिकीट किती?

हे तिकिटाचे दर बदलू शकतात. याचा तक्ता देण्याचे कारण वाचकाला दराचा एक अंदाज यावा इतकेच आहे.

केबिन प्रकार

प्रती व्यक्ती / प्रती रात्र

एकूण तिकीट(7दिवस-8रात्री)

डीलक्स केबिन एका व्यक्तीसाठी

यु.एस.डी. 1100

यु.एस.डी. 7700

डीलक्स केबिन दोन व्यक्तींसाठी

यु.एस.डी. 715

यु.एस.डी. 5005

सुपर डीलक्स एका व्यक्तीसाठी

यु.एस.डी. 1980

यु.एस.डी. 13860

सुपर डीलक्स दोन व्यक्तींसाठी

यु.एस.डी. 990

यु.एस.डी. 6930