Get it on Google Play
Download on the App Store

रेड रिबन एक्सप्रेस

ही ट्रेन एड्स या रोगाबद्दल जनसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी चालवण्यात आली होती. या ट्रेनचे ब्रीद ‘ आयुष्य जगायला सुरुवात करा” असे आहे. ह्या ट्रेनने २००६ आणि २००९ साली भारतातून प्रवास केला. यावेळी या ट्रेनमध्ये असणारे स्वयंसेवक पथनाट्य, कविता, लेख वाचन, प्रदर्शन आणि लोकांचे समुपदेशन करत असत. त्यांनी या काळात या ट्रेनमध्ये काही रुग्णांना उपचारही मिळवून दिले. भारतात रेल्वेचे जाले खूपच मोठे आहे त्यामुळे भारतातील खेडोपाड्यात जाण्यासाठी ह्या ट्रेनचे मोठे योगदान आहे.