Get it on Google Play
Download on the App Store

माणसे ....

शब्दांना जमविण्याचा मी
प्रयत्न खूप केला,
जमवण्या आधीच त्यांनी 
विद्रोह फार केला...

कोसळण्या आधीच वारा
बेफान फार झाला,
भरल्या ढगांस घेवूनी
पसार आज झाला....

कशास हवे खांदे कुणाचे
अब्रूची लक्तरे  वेशीला,
नकोच अशी शब्दे किंवा माणसे
हवा माणूस एकला.....

जोडली होती माणसं चार
क्षणभर आनंद दाटला,
घेवून गेली स्मशानात ती
देह उभा जाळला.....

संजय सावळे.....